Join us
Daily Top 2Weekly Top 5

मलायकामुळे अर्जुनलाही लागलं फिटनेसचं वेड; अभिनेत्याचं बॉडी ट्रांसफॉर्मेशन पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 17:05 IST

1 / 10
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचं नातं कोणापासूनही लपलेलं नाही. या दोघांनीही जाहीरपणे त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे.
2 / 10
मलायका तिच्या वर्कआऊटचे फोटो, व्हिडीओही चाहत्यांसोबत शेअर करते. त्यामुळे तिचं फिटनेसचं वेड साऱ्यांनाच माहित आहे. परंतु, आता तिचं पाहून अर्जुनदेखील फिटनेसकडे वळला आहे.
3 / 10
मलायका तिच्या फिटनेसबाबत किती सजग असते हे साऱ्यांनाच ठावूक आहे. ती दररोज २ ते ३ तास वर्कआऊट, वॉकिंग करत असते.
4 / 10
गेल्या १५ महिन्यांपासून अर्जुन त्याच्या फिटनेसवर भर देत आहे. त्यामुळे तो आता मलायकाप्रमाणेच फिटनेस फ्रिक झाल्याचं दिसून येत आहे.
5 / 10
अलिकडेच अर्जुनने इन्स्टाग्रामवर त्याचे काही फोटो शेअर केले. यात त्याने २०१२ आणि २०२२ या वर्षांमधील दोन फोटो कोलाज करुन शेअर केले आहेत.
6 / 10
या दोन्ही फोटोमध्ये अर्जुनच्या फिटनेसमध्ये झालेला बदल दिसून येत आहे. सोबतत हा फोटो शेअर करताना त्याने एक पोस्टही लिहिली आहे.
7 / 10
या फोटोमध्ये अर्जुनचे सिक्स पॅक एब्ज दिसून येत आहेत. '#workinprogress होण्याचे १५ महिने. माझ्या या प्रवासाविषयी मला खरंच गर्व आहे. त्यामुळे मी ही पोस्ट नंतर अजिबातच डिलीट करणार नाही हे नक्की. फेब्रुवारी २०२१ ते मे २०२२ हा काळ फार कठीण होता. पण मी ट्रकवर कायम राहिलो यातच मला आनंद आहे, असं अर्जुन म्हणाला.
8 / 10
पुढे तो म्हणतो, य सगळ्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. पण, हा प्रवासही सोपा नव्हता. हा प्रवास अजुनही सुरु आहे. पण, आता माझी मानसिकरित्या तयारी झाली आहे. आणि गेल्या १५ महिन्यांपासून मी तेच करतोय. त्यामुळे मला आशा आहे हा प्रवास असाच सुरु राहिल. हो.. हा मी आहे..मीच आहे.
9 / 10
अर्जुनच्या या पोस्टवर सध्या सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण कमेंट करत आहेत. अनेकांनी त्याच्या या परिश्रमाचं कौतुक केलं आहे.
10 / 10
काही युजरने त्याच्या या फिटनेसचं श्रेय मलायकाला दिलं आहे. तिच्या येण्यामुळेच तो फिटनेसकडे सजगतेने पाहु लागला असं काही जणांनी म्हटलं आहे.
टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोराबॉलिवूडसेलिब्रिटी