Join us

४६ वर्षी सिंगल आहे 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, 'या' मराठी अभिनेत्याला करायची डेट, पण...

By देवेंद्र जाधव | Updated: August 11, 2025 13:23 IST

1 / 7
बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री जी ४६ व्या वर्षी सिंगल आहे. ही अभिनेत्री एका मराठी अभिनेत्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होती. ही अभिनेत्री म्हणजे शमिता शेट्टी.
2 / 7
द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोमध्ये शमिता शेट्टी सहभागी झाली होती. त्यावेळी तिने सिंगल असल्याचा खुलासा केलाय.
3 / 7
आई लग्नासाठी मागे लागायची. पण आता ती वेळ निघून गेलीय. त्यामुळे आईनेही आता बोलणं सोडून दिलं, असा खुलासा शमिता शेट्टीने केलाय.
4 / 7
शमिता शेट्टीची बहीण शिल्पा शेट्टीने बहिणीला सिंगल न राहता डेटिंग अॅपचा वापर करण्याचाही सल्ला दिला. शमिता लग्न करुन सेटल व्हावी अशी शिल्पाची इच्छा आहे.
5 / 7
शमिता बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिचं आणि मराठमोळा अभिनेता राकेश बापटच्या डेटिंगच्या चर्चा सुरु झाल्या.
6 / 7
परंतु काही महिने एकमेकांना डेट केल्यावर जुलै २०२२ मध्ये या दोघांनी ब्रेकअप केलं. राकेशला डेट केल्यानंतर शमिता सध्या सिंगल आहे
7 / 7
शमिता कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत नाहीये. शाहरुख खानच्या मोहब्बते सिनेमातून शमिताने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
टॅग्स :शिल्पा शेट्टीबॉलिवूडलग्नरिलेशनशिपरिलेशनशिप