By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 16:02 IST
1 / 7बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार सापडतील ज्यांनी अगदी बालपणातच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. आज त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे, यापैकीच एक नाव म्हणजे फातिमा सना शेख. 2 / 7 दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर फातिमाने चाहत्यांची मनं जिंकली.3 / 7फातिमाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालपणापासूनच केली. मात्र, 'दंगल' या चित्रपटातून तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.4 / 7फातिमा सना शेखने वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी तिच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. तिने कमल हासन आणि शाहरुख खान सारख्या दिग्गजांसोबत बालकलाकार म्हणून काम केले होते.सध्याच्या घडीला ती इंडस्ट्रीतील आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे.5 / 7फातिमाने आजवर ‘दंगल’, ‘लुडो’ ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सारख्या चित्रपटात अभिनय करून लोकप्रियता मिळवली.6 / 7 सध्या ती 'गुस्ताख ईश्क' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात ती अभिनेता विजय वर्मासोबत दिसते आहे. आपलं दिसण आणि हसण्याने चाहत्यांना प्रेमात पाडणारीही नायिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही तितकीच चर्चेत राहिली. 7 / 7आमिर खानच्या 'दंगल' सिनेमात फातिमा सना शेखची मुख्य भूमिका होती. नंतर तिने त्याच्याच 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' सिनेमात काम केलं. या सिनेमानंतर फातिमा आणि आमिरच्या अफेअरची चर्चा जोर धरू लागली होती. आमिर २७ वर्ष लहान अभिनेत्रीला डेट करतोय अशी अफवा पसरली होती. मात्र, त्या निव्वळ अफवा होत्या, असं तिने स्पष्ट केलं होतं.