Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमानला करोडोंची कार, अमिताभ यांना अलिशान बंगला अन् रणवीरला मिळाले हे महागडे गिफ्ट...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 07:00 IST

1 / 9
दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी ‘सत्ते पे सत्ता’ हा सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर मानधनरूपात अमिताभ बच्चन यांना एक अलिशान बंगला गिफ्ट केला होता. त्याचे नाव ‘जलसा’. अमिताभ तेव्हापासून याच बंगल्यात राहतात. 1982 साली ‘सत्ते पे सत्ता’ हा सिनेमा रिलीज झाला होता.
2 / 9
दिग्दर्शक विपुल शाह यांनी खूश होत अक्षय कुमारला 18 लाख रूपयांची विंटेज वॉच गिफ्ट केली होती.
3 / 9
‘किक’ हा सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर साजिद नाडियाडवाला यांनी सलमान खानला 3 कोटी रूपयांची रोल्स रॉयल कार गिफ्ट दिली होती.
4 / 9
‘सिम्बा’च्या शूटींगवेळी दिग्दर्शक रोहित शेट्टीने रणवी सिंगला 8 लाख रूपयांचे घड्याळ भेट म्हणून दिले होते.
5 / 9
‘एकलव्य’ या सिनेमाचे शूटींग संपल्यानंतर दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांनी अमिताभ बच्चन यांना सिल्व्हर रोल्स रॉयस फँटम गिफ्ट दिली होती.
6 / 9
दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आवडता अभिनेता म्हणजे अजय देवगण. ‘आॅल द बेस्ट’ या सिनेमाच्या शूटींगवेळी रोहितने अजयला त्याच्या वाढदिवसाला एक स्पोर्ट्स कार गिफ्ट दिली होती.
7 / 9
‘पद्मावत’मधील दीपिका पादुकोणचा शानदार परफॉर्मन्सवर खुश होत संजय लीला भन्साळींनी दिला ‘जौहर’च्या सीन्समध्ये तिने घातलेला ड्रेस गिफ्ट केला होता. या ड्रेसची किंमत 20 लाख रूपये होती.
8 / 9
‘अग्निपथ’मधील कतरिना कैफच्या जबरदस्त डान्स नंबरवर खूश होत करणने तिला फेरारी गिफ्ट केली होती. या गाडीची किंमत जवळपास 2.2 कोटी होती.
9 / 9
निर्माता व दिग्दर्शक करण जोहरने आलिया भटला एक महागडा क्लच भेट म्हणून दिला होता.
टॅग्स :बॉलिवूडअमिताभ बच्चनसलमान खानअक्षय कुमार