प्रसिद्ध अभिनेत्यावर झाला लैंगिक अत्याचार; बऱ्याच वर्षांनी सत्य आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 12:47 IST
1 / 9प्रसिद्ध गायक, गीतकार आणि अभिनेता पियुष मिश्रा सध्या त्यांच्या 'तुम्हारी औकात क्या हैं पियुष मिश्रा' या आत्मचरित्रामुळे चर्चेत येत आहेत.2 / 9पियुष मिश्रा यांनी २००० साली आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.3 / 9विशाल भारद्वाज यांच्या 'मकबूल', अनुराग कश्यप यांचा 'गुलाल' आणि २०१२ सालचा 'गॅग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटांमधून खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.4 / 9आपल्या अभिनयामुळे आणि गीतांमुळे ओळखले जाणारे पियुष सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत.5 / 9 बिंधास्तपणे आयुष्य जगणाऱ्या पियुष यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत. यामध्येच त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.6 / 9अलिकडेच पियूष मिश्रा यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं सांगितलं.7 / 9सातवीमध्ये असताना त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. तसंच त्यांच्या आत्मचरित्रामध्येही याविषयीचा उल्लेख असल्याचं म्हटलं जातं.8 / 9'जवळपास ५० वर्षांपूर्वी आमच्या नात्यातील एका महिलेने माझ्यावर अत्याचार करायचा प्रयत्न केला होता. या प्रकाराचा परिणाम माझ्या मनावर इतका झाला होता की बरीच वर्ष मी त्या भीतीखाली जगत होतो,'9 / 9'तुम्हारी औकात क्या हैं पियुष मिश्रा' या आत्मचरित्रामध्ये पियुष यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. अगदी त्यांच्या फिल्मी करिअरपासून ते कुटुंबापर्यंत अनेक गोष्टींचा यात समावेश आहे.