Anjali Anand : "कमी पैशात खूप वेळा..."; घर चालवण्यासाठी अभिनेत्रीने केला अनेक अडचणींचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 15:47 IST
1 / 10'डब्बा कार्टेल' या वेब सिरीजमध्ये अंजली आनंद एका ब्रोकरच्या भूमिकेत दिसत आहे. तिने आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.2 / 10एका मुलाखतीत अंजलीने सांगितलं की, 'इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागली. कमी पैशात खूप वेळा काम करावं लागलं.'3 / 10'कधीही कमी पैशात काम करावं लागतं. कारण आयुष्य थांबणार नाही. आपल्याला कुठेना कुठेतरी समान रक्कम मिळते.'4 / 10'पण कधीकधी तुम्हाला अशा गोष्टी कराव्या लागतात जिथे तुम्हाला कमी पैसे मिळतात.' 5 / 10'त्या लोकांना माहित नसतं आणि त्यांना समजत नाही की पडद्यामागे आपल्याला किती त्रास सहन करावा लागतो.'6 / 10'मला काम चांगलं मिळत आहे पण मला घरही चालवायचं आहे. म्हणून मला वाटतं तुम्ही मला पैसे द्या, तुमच्याकडे खूप पैसे आहेत.'7 / 10'तुम्ही अशा अनेक लोकांना खूप पैसे देत आहात जे तुम्हाला खूप त्रास देतात. म्हणून जे चांगले काम करतात त्यांना पैसे द्या' असंही अंजलीने म्हटलं आहे. 8 / 10‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ यामध्ये अंजलीने साकारलेल्या गायत्रीच्या भूमिकाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 9 / 10‘रॉकी और रानी’ चित्रपटाशिवाय अंजली ‘खतरों के खिलाडी’च्या १३ व्या पर्वात सहभागी झाली होती.10 / 10