By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 01:05 IST
1 / 14मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा साखरपुडा झाला आहे. अंबानी कुटुंबाने हा कार्यक्रम आपल्या घरीच अर्थात अँटिलियामध्येच धुमधडाक्यात पार पाडला. या साखरपुड्याच्या कार्यक्रमास बॉलीवुड पासून ते क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.2 / 14या साखरपुड्याचे फोटो आता समोर आले आहेत. यात अनंत आणि राधिका आपल्या कुटुंबीयांसोबत दिसत आहेत.3 / 14विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच अनंत आणि राधिकायांची रोका सेरेमनीही झाली होती. याच्या मेहंदी सेरेमनीचे फोटोज आणि व्हिडिओ बरेच व्हायरल ढाले होते.4 / 14साखरपुड्यादरम्यान राधिका मिर्चंटने गोल्डन आणि क्रीम कलरचा लेहेंगा परिधान केला होता. याशिवाय तिने गळ्यात डायमंडचा सेट, हातात डायमंडचे कडेही घातले होते.5 / 14तर, अनंत अंबानी यावेळी निळ्या रंगाच्या शेरवानीत दिसला. या दोघांनी एकमेकांसोबत आणि कुटुंबीयांसोबत पोजही दिल्या.6 / 14या प्रसंगी नीता अंबानी गोल्डन आणि क्रीम कॉम्बिनेशनच्या रेड बॉर्डरच्या साडीवर दिसल्या. तर मोठी सून श्लोका लाइट ब्लू कलरच्या लेहेंग्यात अत्यंत सुंदर दिसत होती. 7 / 14यावेळी ईशा अंबानीही पतीसोबत दिसली. साखरपुड्यानंतर, अंबानी कुटुंबाने सोबत फोटोदेखील काढले. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.8 / 14अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या एंगेजमेंट इव्हेंटमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या यांनीही उपस्थिती लावली. यादरम्यान ऐश्वर्या हिरव्या रंगाच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत होती.9 / 14यावेळी बॉलीवुडचा भाईजान सलमान खानही स्पॉट झाला. या कार्यक्रमासाठी तो आपली भाजी अलिजेह अग्निहोत्रीसोबत आला होता.10 / 14शाहरुख खानही आपल्या कुटुंबासह अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यासाठी पोहोचला होता. यावेळी आयर्यनने आई गौरी सोबत पोजही दिली.11 / 14या कार्यक्रमासाठी सचिनही पत्नीसोबत आला होता.12 / 14यावेळी, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणही साखरपुड्यात दिसून आले. यावेळी दीपिकाने लाल रंगाची साडी तर रणबीरने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती. यावेळी, अॅक्टर वरुण धवनही पत्नी नताशा दलालसोबत आला होता.13 / 14या साखरपुड्यात आलेली सारा अली खानही व्हाईट ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. याशिवाय आदित्य ठाकरेही या साखरपुड्यासाठी उपस्थित होते.14 / 14बॉलीवूड स्टार अक्षय कुमारनेही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुड्यासाठी उपस्थित होता. याशिवाय, दिग्दर्शक करण जोहरनेही या कार्यक्रमास हजेरी लावली होती.