Join us
Daily Top 2Weekly Top 5

राम चरण आणि अल्लू अर्जुनमध्ये आहे खास नातं; तुम्हाला माहितीये का त्यांचं फॅमिली रिलेशन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 12:32 IST

1 / 11
ग्लोबल स्टार बनलेला अभिनेता राम चरण आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. रामने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आणि नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. त्यांच्या या खास दिवशी सेलिब्रेटिंसह चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
2 / 11
आज राम चरणच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घेऊया. दक्षिणेतील अनेक बड्या कलाकारांचं राम चरणसोबत भावाचं नातं आहे. यामध्ये अल्लू अर्जुनचं नाव प्रथम येते. सुपरस्टार अल्लू आणि राम हे भाऊ आहेत.
3 / 11
बॉलिवूड इंडस्ट्रीत कपूर कुटुंब हे खूप प्रसिद्ध आहे. असचं ग्लोबल स्टार राम चरणचे कुटुंब आहे. याची सुरुवात अल्लू कुटुंब आणि कोनिडेला कुटुंबापासून होते. राम चरणचे आजोबा कोनिडेला शिवशंकर वरप्रसाद राव यांच्यापासून कुटुंब सुरू झालं.
4 / 11
कोनिडेला शिवशंकर वरप्रसाद यांना चिरंजीवी, नागेंद्र बाबू आणि पवन कल्याण अशी तीन मुलं आहेत. तिन्ही मुले तेलुगू चित्रपटसृष्टीतील मोठे स्टार आहेत. चिरंजीवीची पत्नी अल्लू अरविंदची ( अल्लू अरविंद यांचा मुलगा हा अल्लू अर्जून आहे) बहीण सुरेखा आहे.
5 / 11
चिरंजीवी हे राम चरणचे वडील आहेत. नागेंद्र बाबू आणि पवन कल्याण हे राम चरणचे काका आहेत. तर राम चरणाला दोन काकू आहेत, त्यांची नावे विजया दुर्गा आणि माधवी राव अशी आहेत. राम चरण यांनी चिरंजीवीचा वारसा सांभाळला आहे.
6 / 11
नागेंद्र बाबूला मुलगा वरुण तेज आणि मुलगी निहारिका आहे. तर पवन कल्याणचे एकूण तीन लग्न झाली आहेत. राम चरणला सुष्मिता कोनिडेला आणि श्रीजा कोनिडेला या दोन बहिणी आहेत. ज्या मीडियापासून लांब असतात.
7 / 11
तर अल्लू अर्जुनचे आजोबा अल्लू रामलिंगय्या होते. अल्लू अर्जुन हा अल्लू अरविंद यांचा मुलगा आहे, जे दक्षिणेतील प्रसिद्ध व्यक्ती आहेत. ते निर्माता असून त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
8 / 11
अल्लू अरविंद यांना वसंत लक्ष्मी आणि सुरेखा नावाच्या दोन बहिणी आहेत. सुरेखा यांचं अभिनेता चिरंजीवीसोबत लग्न झालं आहे.
9 / 11
या नात्याने मेगास्टार चिरंजीवी हे अल्लू अर्जुनचे आते मामाजी लागतात. अल्लू अर्जुनची आत्या ही राम चरणची आई आहे.
10 / 11
म्हणजे चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण हा अल्लू अर्जुनचा नात्याने आतेभाऊ लागतो.
11 / 11
अल्लू अरविंद यांना अल्लू व्यंकटेश, अल्लू अर्जुन आणि अल्लू शिरीष ही तीन मुले आहेत. या तीन भावांमध्ये फक्त अल्लू अर्जुन विवाहित आहे.
टॅग्स :राम चरण तेजाअल्लू अर्जुनTollywoodसेलिब्रिटीचिरंजीवी