Join us  

'...म्हणून मी प्रत्येक इंटिमेट सीननंतर क्रीम लावते'; उदिता गोस्वामीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 12:11 PM

1 / 8
अभिनेत्री उदिता गोस्वामी हिला ओळखत नाही असं म्हणणारा क्वचितच एखादा व्यक्ती असेल. 'पाप' या सिनेमातून तिने २००३ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
2 / 8
'पाप' या सिनेमात उदिताने अभिनेता जॉन अब्राहम याच्यासोबत दिलेल्या बोल्ड सीनमुळे ती चांगलीच चर्चेत आली. या सिनेमानंतर तिने अक्सर या सिनेमातही असेच काही इंटिमेट सीन दिले.
3 / 8
उदिताने आता इंडस्ट्रीपासून फारकत घेतली आहे. मात्र, तिची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगते. यामध्येच तिने एका मुलाखतीमध्ये इंटिमेट सीन आणि किसिंग सीनविषयी भाष्य केलं होतं.
4 / 8
कोणत्याही बोल्ड सीनचं शूटिंग झाल्यानंतर ती सगळ्या शरीरावर आणि चेहऱ्यावर क्रीम लावते असा खुलासा तिने एका मुलाखतीमध्ये केला होता.
5 / 8
''सिनेमाचं ज्यावेळी शुटिंग सुरु असतं त्यावेळी सेटवर खूप लोकांची गर्दी असते. त्या सगळ्यांसमोर इंटिमेट सीन देणं किंवा किसिंग सीन देणं खरंच फार कठीण असतं.'
6 / 8
'मला कोणत्याही अभिनेत्यासोबत किसिंग सीन देणं एक प्रकारे टास्क असल्यासारखंच वाटतं. कारण बऱ्याचदा अभिनेत्यांच्या हनुवटीमुळे माझ्या चेहऱ्यावर इजा होते', असं उदिता म्हणाली.
7 / 8
पुढे ती म्हणते, 'ज्यावेळी मला सिनेमात किसिंग सीन द्यायचा असतो त्यावेळी कायम मी सीन शूट झाल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर क्रीम लावते. तसंच काही वेळा इंटिमेट सीन वा किसिंग सीन दिल्यानंतर अॅलर्जी होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे असे सीन शूट केल्यानंतर मी कायम शरीरावर, चेहऱ्यावर क्रीम लावते.'
8 / 8
टॅग्स :बॉलिवूडजॉन अब्राहमसेलिब्रिटीसिनेमा