या सुप्रसिद्ध कलाकारांचं मूळ नाव माहितीये का? एकीने चक्क ज्योतिषाचं ऐकून नावात केला बदल
By देवेंद्र जाधव | Updated: March 20, 2025 16:56 IST
1 / 7अनेकांना ठाऊक नसेल पण अजय देवगणचं मूळ नाव वेगळं आहे. विशाल वीर देवगण हे अजयचं मूळ नाव आहे. इंडस्ट्रीत येण्याआधी अजयने नावात बदल केला2 / 7दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी विविध भूमिकांमधून बॉलिवूडमध्ये राज्य केलं. दिलीप कुमार यांचं मूळ नाव मोहम्मद युसुफ खान असं होतं. परंतु नंतर त्यांनी दिलीप कुमार हे नवीन नाव ठेवलं 3 / 7चिरतरुण अभिनेते जितेंद्र यांचं मूळ नाव वेगळं आहे. जितेंद्र यांचं मूळ नाव रवी कपूर असं आहे. 4 / 7अक्षय कुमारचं मूळ नाव वेगळंच आहे याविषयी आता अनेकांना माहित असेल. राजीव भाटिया असं अक्षयचं मूळ नाव असून अभिनेता बनण्यापूर्वी अक्षयने नावात बदल केला.5 / 7शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. शिल्पाचं मूळ नाव आधी अश्विनी होतं. परंतु एका ज्योतिषाने दिलेल्या सल्ल्यानुसार शिल्पाने नावात बदल केला.6 / 7अॅक्शन आणि डान्ससाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा लेक टायगरचं मूळ नाव हेमंत श्रॉफ असं होतं.7 / 7बॉलिवूडसह सध्या साऊथ इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री म्हणजे कियारा अडवाणी. कियाराचं मूळ नाव आलिया होतं. परंतु आलिया भट त्यावेळी आधीच लोकप्रिय असल्याने आलिया हे नाव बदलून अभिनेत्रीने कियारा हे नाव ठेवलं.