Join us

Upcoming Bollywood Remake Movies : बॉलिवूडला रिमेकचा आधार? सेल्फी-शहजादानंतर रांगेत आहेत हे सिनेमे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 10:51 IST

1 / 9
सुपरस्टार सलमान खानचा किसी का भाई किसी की जान लवकरच रिलीज होतोय. हा सिनेमा अजित कुमारच्या वीरम या ब्लॉकबस्टर सिनेमाचा रिमेक असल्याचं कळतंय.
2 / 9
अजय देवगणचा आगामी सिनेमा भोला हाही रिमेक आहे. होय, ब्लॉकस्टर कॅथी या तामिळ सिनेमाचा हा रिमेक आहे.
3 / 9
तामिळ सुपरस्टार सूर्याचा सोरारई पोट्टरू हा सिनेमा तुफान गाजला. आता अक्षय कुमार याचा रिमेक घेऊन येतोय. लवकरच सिनेमाचं शूटींग सुरू होणार आहे.
4 / 9
दिग्दर्शक शंकर आपल्या अन्नियान या सुपरडुपर चित्रपटाचा पुन्हा हिंदी रिमेक बनवणार आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अन्नियान हिंदीतही रिलीज झाला होता. पण आता हा सिनेमा नव्याने बनणार आहे.
5 / 9
वरूण धवनचा सनकी हा आगामी सिनेमा एका तामिळ सिनेमाचा रिमेक आहे. या चित्रपटात वरूण एका सनकी तरूणाची भूमिका साकारताना दिसेल.
6 / 9
द ग्रेट इंडियन किचन हा मल्याळम सिनेमा गाजला. आता सान्या मल्होत्राला घेऊन याचा हिंदी रिमेक बनवण्याची तयारी सुरू झाली आहे.
7 / 9
आदित्य राय कपूर व मृणाल ठाकूर यांचा गुमराह हा सिनेमा ठडम या तामिळ सिनेमाचा रिमेक आहे. खूप आधी या सिनेमाची घाेषणा करण्यात आली होती.
8 / 9
अय्यपनम या ब्लॉकबस्टर मल्याळम सिनेमाचा हिदी रिमेक करण्याचाही प्लान आहे. रिपोर्टनुसार यात अभिषेक बच्चन व जॉन अब्राहम लीड भूमिकेत दिसणार आहेत.
9 / 9
द इंटर्न हा एक इंग्रजी सिनेमा. या सिनेमाचा याच नावाचा हिंदी रिमेक येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात अमिताभ बच्चन व दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
टॅग्स :बॉलिवूडसिनेमासलमान खानअजय देवगण