By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 15:57 IST
1 / 7हिंदी सिनेसृष्टीतील एक अशी अभिनेत्री जिने देवानंद, अमिताभ बच्चन ते आताच्या आमिर खानसोबत काम केलं. पण आज ही अभिनेत्री वाईल्डलाईफ फोटोग्राफर म्हणून नाव कमावत आहे.2 / 7ही अभिनेत्री आहे वहीदा रहमान. वहीदा यांनी सिनेसृष्टीतला एक काळ गाजवला आहे. पण आज त्या अभिनेत्री नाही तर वाईल्डलाईफ फोटोग्राफर बनून जंगलात भटकंती करत आहेत.3 / 7वहीदा रहमान यांना नेहमीच फिरण्याची आणि निसर्गाची आवड होती, पण आता त्यांनी कॅमेरा हातात घेऊन हे क्षण टिपायला सुरुवात केली आहे. अभिनयाचं क्षेत्र गाजवून त्या आपला छंद जोपासत आहेत.4 / 7आपल्या या आवडीसाठी वहीदा यांनी केवळ भारताच्या जंगलांचीच सफर केली नाही, तर त्या आफ्रिकेसारख्या दुर्गम भागातही जाऊन आल्या आहेत. तिथेही त्यांनी फोटोग्राफीची जादू अनुभवली आहे.5 / 7ताडोबा, बांधवगड आणि काझीरंगा यांसारख्या भारतातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पांपासून ते आफ्रिकेतील मसाई मारापर्यंत वहीदा रहमान यांनी प्रवास केला आहे. 6 / 7वहीदा रहमान या आपल्याल्या शेवटच्या रंग दे बसंती आणि दिल्ली ६ या सिनेमात अभिनय करताना दिसल्या. उतारवयात वहीदा यांनी सिनेमात काम करणं कमी केलंय.7 / 7८७ व्या वर्षीही वहीदा रहमान यांची ही जिद्द आणि निसर्गाप्रती असलेले प्रेम आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. एकूणच माणूस कोणत्याही वयात छंद जोपासू शकतो, हेच याचं उदाहरण आहे.