By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:11 IST
1 / 8रणबीर कपूरच्या 'रामायण' (Ramayana) सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. ४००० कोटी बजेट असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन नितेश तिवारी करत आहेत. नमित मल्होत्रा यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.2 / 8गेल्या १० वर्षांपासून नितेश तिवारी आणि नमित मल्होत्रा या सिनेमाची तयारी करत होते. नितेश तिवारींनी स्वत: या महाकाव्याचा खोलवर अभ्यास केला.3 / 8सिनेमाचं व्हीएफएक्स मुख्य आकर्षण असणार आहे. हॉलिवूडच्या टीमने याची जबाबदारी घेतली आहे. तसंच प्रसिद्ध संगीतकार हॅन्स झिमर आणि ए आर रहमान यांनी मिळून सिनेमाला संगीत दिलं आहे.4 / 8सिनेमाची स्टारकास्टही तगडी आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, सनी देओल, यश, रवी दुबे आदिनाथ कोठारे, लारा दत्ता, अरुण गोविल, रकुल प्रीत सिंह यासह आणखी बरेच कलाकार आहेत. 5 / 8टीव्ही अभिनेता रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाच्या सेटवरील रवी आणि रणबीरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 'रामायण पार्ट १'चं शूट संपल्यानंतर त्यांनी सेलिब्रेट केलं असा तो व्हिडिओ होता.6 / 8सिनेमात लक्ष्मणाची पत्नी उर्मिलाची भूमिका कोण साकारणार माहितीये का? २७ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. 7 / 8ही अभिनेत्री सुरभी दास. तिने इन्स्टाग्रामवर रणबीर, साई पल्लवी आणि नितेश तिवारींसोबतचा फोटो शेअर केला होता. या बिग बजेट सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्याने सुरभीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.8 / 8सुरभी याआधी 'नीमा डेन्जोंगपा' या मालिकेत दिसली होती. या मालिकेमुळेच तिला ओळख मिळाली. तसंच तिने बंगाली सिनेमातही काम केलं आहे.