Join us
Daily Top 2Weekly Top 5

"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 16:07 IST

1 / 10
अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर संदीपा विर्क गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ६ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात संदीपा तिहार जेलमध्ये ४ महिने होती. आता ती जामिनावर बाहेर आली आहे.
2 / 10
एका मुलाखतीत संदीपाने जेलमधील अनुभव आणि आपल्या पर्सनल आयुष्याशी संबंधित अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला. ज्योत्स्ना बेदी यांच्या पॉडकास्टमध्ये संदीपाने पंजाबी फिल्म इंडस्ट्रीची पोलखोल केली आहे.
3 / 10
अभिनेत्री म्हणाली की, 'पंजाबी इंडस्ट्रीमध्ये खूप घाण पसरलेली आहे. तिथला एका दिग्दर्शक चक्क रात्री माझ्या खोलीत आला होता. एका फिल्मसाठी मी ७ दिवस शूटिंग केलं होतं, ज्यामध्ये दिलप्रीत ढिल्लों मुख्य अभिनेता होता.'
4 / 10
'आम्ही अमृतसरच्या खालसा कॉलेजमध्ये शूट पूर्ण केलं होतं. शूटिंगनंतर रात्री १२ वाजता दिग्दर्शकाने माझ्या खोलीचा दरवाजा ठोकला. ओळखीचे असल्याने मी दरवाजा उघडला. जर तुमचा एखादा मित्र किंवा ओळखीचा माणूस असेल, तर तुम्ही सहज दरवाजा उघडता.'
5 / 10
'मी त्यांना म्हणाले की सर मी झोपले होते, तर तो थेट येऊन माझ्या बेडवरच बसला. तो मला म्हणाला की, मी इथेच राहणार आणि इथेच झोपणार. जेव्हा त्याने असं म्हटलं, तेव्हा मी त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला की मला हे जमणार नाही.'
6 / 10
'त्यावर त्याने मला धमकी दिली की, मग मी तुला चित्रपटातून काढून टाकेन. त्याला वाटलं की मी घाबरून त्याच्या मागणीला होकार देईन, कारण शूटिंग सुरू झालं होतं.'
7 / 10
'मला वाटलं तो फक्त बोलतोय, मला चित्रपटातून काढणार नाही. पण त्याने खरंच मला चित्रपटातून बाहेर काढलं. सकाळी उठल्यावर तो म्हणाला की आज काही शूटच नाही. मी देखील 'ठीक आहे' असं म्हणून निघून आले.'
8 / 10
संदीपा पुढे म्हणते की, 'जर मी तो चित्रपट केला असता तरी काय फरक पडला असता? तो चित्रपट फ्लॉपच झाला. कारण जो माझ्याशी वाईट वागतो, त्याचं वाईट होताना मी पाहिलं आहे.'
9 / 10
'जेव्हा एखादी व्यक्ती प्रामाणिक असते आणि कुणी तिच्याशी गैरवर्तन करतं, तेव्हा त्याचा बदला नियती नक्कीच घेते.' याच मुलाखतीत संदीपाने तिहार जेलमधील अनुभवावरही भाष्य केलं.
10 / 10
अभिनेत्रीने सांगितलं की, 'जेलमध्ये प्रवेश करताना होणारी तपासणीची प्रक्रिया अत्यंत अपमानजनक असते. जेलमध्ये पाठवण्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये माझी प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात आली होती. तिथे माझ्यापेक्षा कमी वयाची मुलं मला प्रेग्नन्सी टेस्ट करायला सांगत होते. माझ्यासाठी तो अनुभव अत्यंत लाजिरवाणा होता.'
टॅग्स :टिव्ही कलाकारबॉलिवूड