सुंदर दिसत असल्यामुळे अनुराग कश्यपच्या सिनेमात काम मिळेना, अभिनेत्रीने व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 12:43 IST
1 / 9अनुराग कश्यपचे चित्रपट म्हटलं की 'गँग्स ऑफ वासेपुर', 'रमण राघव', 'देव डी' असे इंटेन्स सिनेमे डोळ्यासमोर येतात.2 / 9अतिशय रॉ, धीरगंभीर, रक्तपात, शिव्या अशा सर्व गोष्टी अनुराग कश्यपच्या सिनेमात पाहायला मिळतात. त्यामुळे अशा सिनेमात भूमिका करणारे कलाकारही कसलेले असतात.3 / 9इंडस्ट्रीतले ग्लॅमरस चेहरे अनुराग कश्यपच्या सिनेमांमध्ये दिसत नाहीत. कारण त्यांना तशा भूमिका शोभून दिसणाऱ्या नसतात. 4 / 9मात्र एक अशी अभिनेत्री आहे जी दिसायला अतिशय सुंदर, ग्लॅमरस आहे. तिला अनुराग कश्यपच्या सिनेमात भूमिका साकारायची इच्छा आहे. मात्र तिच्या लूक्समुळेच तिला त्याच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळालेली नाही.5 / 9ही अभिनेत्री आहे संदीपा धर. संदीपाने 'इसी लाईफ मे', 'हिरोपंती', 'छत्तीस और मैना' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. कागज सिनेमात तिने डान्स नंबर केला.6 / 9नुकतंच 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, 'प्रामाणिकपणे सांगायचं तर मला नेहमीच अनुराग कश्यपच्या सिनेमांमध्ये काम करायचं होतं. गंभीर, परिपक्व, गावातली गोष्ट अशाच भूमिका मला करायच्या होत्या.'7 / 9'पण मी दिसते अशी...जी अजिबातच एखाद्या साधारण गावातली वाटत नाही. त्यांनीही मला तेच सांगितलं की मी खूप शहरी, ग्लॅमरस वाटते.'8 / 9'पण माझं असं होतं की तुम्ही माझी ऑडिशन घ्या, मेकअप करुन माझा तसा लूक करा. एकदा माझी स्क्रीन टेस्ट तरी घेऊन बघा. तुम्हाला नंतर मला सिनेमात नसेल घ्यायचं तर नका घेऊ. पण किमान मला ऑडिशनची संधी तर द्या.' 9 / 9'मला संधी मिळवण्यासाठी अक्षरश: झगडावं लागलं आहे. असे अनुभव अनेकदा आले आहेत. बॅकग्राऊंड पाहून, नेपोटिझममुळेही मी संधी गमावल्या आहेत.