अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची फिल्म इंडस्ट्रीत 10 वर्षे! शेअर केले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 19:53 IST
1 / 10'यारिया' या सिनेमाने तरुणाईला अक्षरशः वेडं करून सोडलं होतं. या सिनेमामधील हनी सिंगची गाणी आजही सर्वांच्या ओठी आहे. याहून जास्त लक्षात राहिली ती एक अभिनेत्री म्हणजे रकुल प्रीत सिंग.2 / 10रकुल प्रीत सिंगने २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यारिया’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.3 / 10या सिनेमाला आणि रकुल प्रीत सिंगला फिल्म इंडस्ट्रीत 10 वर्षे पुर्ण झाली आहेत. या निमित्ताने तिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. 4 / 10तिने लिहलं, 10 वर्षांपूर्वी, जेव्हा मी पहिल्यांदा बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले होते, तेव्हा मी फक्त मोठी स्वप्ने बाळगलेली एक तरुण मुलगी होते. आज मी जिथे आहे. तिथे पोहोचायला मेहनत, चिकाटी, सातत्य लागलं'. 5 / 10पुढे तिनं लिहलं, 'अजून बरेच काही साध्य करायचे आहे. पण, मी केलेल्या कामाबद्दल मनात खूप कृतज्ञता आहे.कारण ते माझ्या तरुण मुलीसाठी ते अजूनही स्वप्नवत आहे. तुम्ही सर्वांनी मला माझी स्वप्ने साकार करण्यात मदत केली'. 6 / 10आजवर तिने अनेक सिनेमामध्ये काम केलं आहे. तिने आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर अनेक चाहते बनवले आहेत.7 / 10रकुल ही उद्योग क्षेत्रात देखील पुढे आहे. फक्त सिनेमे नाही तर बिझनेसमुधून अभिनेत्री कोट्यवधी कमावते. तिची यशाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. 8 / 10रकुल प्रीत सिंग हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, ती अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. 9 / 10मागील जवळपास तीन वर्षांपासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत.10 / 10दोघं गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं बोललं जात आहे.