Join us

पहिल्या पतीच्या लग्नात अभिनेत्रीचं वय होतं फक्त १०! दोन मुलांचे वडील असलेल्या मुस्लिम हिरोच्या प्रेमात पडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 14:15 IST

1 / 9
बॉलिवूडमध्ये कधी कोणाचा घटस्फोट होईल आणि कधी कोण कोणाशी पुन्हा लग्नगाठ बांधेल सांगता येत नाही. बीटाऊनमध्ये अनेक विचित्र रिलेशनशिप पाहायला मिळतात.
2 / 9
अशीच एक अभिनेत्री जी बॉलिवू़मध्ये गेल्या २५ वर्षांपासून आहे. तसंच आजही वयाच्या ४४ व्या वर्षीही ती तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे.
3 / 9
या अभिनेत्रीने तिच्यापेक्षा १० वर्षांनी मोठ्या असलेल्या मुस्लिम अभिनेत्यासोबत केलं. तो अभिनेता ज्याला पहिल्या पत्नीपासून आधीच दोन मोठी मुलं होती.
4 / 9
विशेष म्हणजे पतीच्या पहिल्या लग्नात ही अभिनेत्री केवळ ११ वर्षांची होती. होय आणि ती त्याच्या लग्नाला गेलीही होती.
5 / 9
अभिनेत्रीला आता दोन गोंडस मुलंही आहेत. मात्र मुलांच्या नावावरुन तिला चांगलंच ट्रोल केल गेलं. यावरुन मोठा वादंग पसरला होता.
6 / 9
आतापर्यंत तुम्ही ओळखलंच असेल ही अभिनेत्री आहे करीना कपूर खान. करीनाने २०१२ साली सैफ अली खानशी लग्न केलं. आज हे कपल बीटाऊनमधलं प्रसिद्ध कपल आहे.
7 / 9
सैफची पहिली बायको अमृता सिंह होती. अमृता सैफपेक्षा तब्बल १३ वर्षांनी मोठी आहे. सैफने वयाच्या २१ व्या वर्षीच अमृताशी लग्न केलं होतं. त्यांना सारा आणि इब्राहिम ही मुलंही झाली. २००४ साली त्यांनी घटस्फोट घेतला.
8 / 9
करीना कपूरही सैफ-अमृताच्या लग्नाला बहीण करिष्मासोबत गेली होती. तेव्हा करीना ११ वर्षांचीच होती आणि तिचा स्टेजवर सैफ-अमृताचं अभिनंदन करतानाचा फोटोही मध्यंतरी व्हायरल झाला होता.
9 / 9
सैफ-करीना आज बीटाऊनमधलं रॉयल कपल आहे. पंजाबी कुटुंबातील अभिनेत्रीने घटस्फोटित आणि दोन मुलं असलेल्या मुस्लिम अभिनेत्याशी लग्न केल्याने तेव्हा करीनाला रोषाला सामोरं जावं लागलं होतं.
टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान बॉलिवूडलग्न