By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:26 IST
1 / 7टीव्ही जगतातील लोकप्रिय जोडी दिव्यंका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. लग्नाच्या १० वर्षांनंतर ही जोडी आता आई-बाबा होणार आहे2 / 7दिव्यंकाने सोशल मीडियावर पती विवेकसोबतचे काही खास फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी अर्थात गरोदर असल्याची 'गुड न्यूज' चाहत्यांसोबत शेअर केली आहे.3 / 7दिव्यंका आणि विवेक यांचे लग्न २०१६ मध्ये झाले होते. तेव्हापासून ही जोडी टेलिव्हिजनवरील सर्वात आवडत्या जोड्यांपैकी एक मानली जाते. अनेकदा त्यांना मुलाबद्दल प्रश्न विचारले जात असत, मात्र योग्य वेळेची वाट पाहत असल्याचे त्यांनी नेहमीच सांगितले होते.4 / 7आता लग्नाला १० वर्ष झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात या नव्या पाहुण्याचे किंवा पाहुणीचे आगमन होणार असल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. दिव्यांका आणि विवेकने पांढऱ्या रंगाचे एकमेकांना मॅचिंग कपडे परिधान केले आहेत5 / 7एका फोटोत विवेक आणि दिव्यांका दोघांच्या हातात चिमुकला शूज दिसून येतोय. याशिवाय विवेकने अत्यंत प्रेमाने दिव्यांकाच्या बेबी बंपवर हात ठेवला आहे.6 / 7जेव्हा तुम्हाला वाटतं की आयुष्य आता परिपूर्ण झालं आहे तेव्हाच तुमच्या आयुष्यात एक नवीन चाप्टर समाविष्ट होतो, अशा खास शब्दांमध्ये दिव्यांकाने पोस्ट लिहून मनातील आनंद व्यक्त केलाय.7 / 7दिव्यंका त्रिपाठी ही 'ये है मोहब्बतें' या मालिकेतील 'इशिता' या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली होती, तर विवेक दहियानेही अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे.