By देवेंद्र जाधव | Updated: March 29, 2026 13:23 IST
1 / 7सुपरहिट सिनेमा दिला तरीही लोक या अभिनेत्रीला पनौती म्हणायचे. पुढे सिनेमात काम मिळणं कमी झालं परंतु एका सिनेमामुळे या अभिनेत्रीचं नशीब बदललं आणि तिने स्वतःवरचा टॅग पुसुन टाकला.2 / 7ही अभिनेत्री आहे दिया मिर्झा. 'रेहना है तेरे दिल में' सारख्या सुपरहिट चित्रपटातून पदार्पण करूनही, एका टप्प्यावर दियाला चित्रपटसृष्टीतील लोक 'पनौती' म्हणून हिणवत असत, असे तिने सांगितले.3 / 7सुरुवातीच्या यशानंतर दियाचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ओळीने फ्लॉप झाले. चित्रपटसृष्टीच्या नियमानुसार, जेव्हा एखादा कलाकार फ्लॉप होतो, तेव्हा लोक तिच्याकडे पाठ फिरवू लागतात. दियाच्या बाबतीतही तेच घडले.4 / 7'माझे एकापाठोपाठ एक चित्रपट चालले नाहीत आणि अचानक निर्मात्यांनी मला काम देणे बंद केले. इतकेच नाही तर लोक माझ्या मागे मला 'पनौती' म्हणू लागले होते,' असे दियाने भावुक होत सांगितले.5 / 7'मला असे वाटू लागले होते की माझे करिअर आता संपले आहे. लोक माझ्याशी बोलताना संकोच करायचे. पण मी हार मानली नाही. मी स्वतःवर विश्वास ठेवला आणि लहान-मोठ्या भूमिकांमधून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला,' असं दिया म्हणाली.6 / 7दियाने 'संजू', 'थप्पड' आणि 'काफिर' सारख्या प्रोजेक्ट्समधून आपल्या अभिनयाची चुणूक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. अशाप्रकारे दियाने स्वतःवरचा पनौतीचा टॅग मिटवून टाकला.7 / 7आज दिया मिर्झा केवळ एक अभिनेत्रीच नाही, तर पर्यावरणासाठी काम करणारी एक कार्यकर्ती म्हणूनही ओळखली जाते. विविध सिनेमे, ब्रँड्स, जाहिरातींमधून दिया वर्षाला २५ ते ८० कोटी रुपये कमावते.