Join us

कोकणात घर, साधं राहणीमान; अंकिता वालावलकरच्या कुटुंबाला पाहिलंत का? बहिणीही दिसतात खूप सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:06 IST

1 / 10
'कोकण हार्टेड गर्ल' म्हणजेच अंकिता वालावलकर (ankita prabhu walawalkar) बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) पाचव्या सीझनमधून घराघरात पोहचली.
2 / 10
अंकिता वालावलकरच्या घरी लगीनघाई सुरू झालीय. ती तिचा बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधणार आहे.
3 / 10
नुकतेच अंकिता आणि कुणाल यांचे प्री व्हेडिंग व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
4 / 10
अंकिता वालावलकर हिने नुकतेच तिच्या फॅमिलीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
5 / 10
या फोटोत तिने आई वडिलांचा समुद्रकिनारी पाठमोरे उभे असलेला फोटो शेअर केला आहे.
6 / 10
समुद्रकिनारी कुणाल अंकिता आणि तिच्या आई वडिलांसोबत छान गप्पा मारताना समुद्र किनारी फेरफटका मारताना दिसत आहेत.
7 / 10
या फोटोत कुणालचं अंकिताच्या आई वडिलांसोबतचे छान बॉण्डिंग पाहायला मिळत आहे.
8 / 10
या फॅमिली फोटोत ती तिच्या लहान बहिणींसोबत वाळूत किल्लादेखील बनवताना दिसत आहे.
9 / 10
अंकिताच्या बहिणीदेखील तिच्यासारख्याच दिसायला सुंदर आहेत. अंकिताचे कुटुंब कोकणात मालवणमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांचे राहणीमान अगदी साधे आहे.
10 / 10
अंकिता आणि कुणाल यांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही, तिचे चाहते त्यांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
टॅग्स :अंकिता प्रभू वालावलकरबिग बॉस मराठी