अवघ्या २२ वर्षांची मुलगी... २ मुलांची आई... पुष्पा-२ मध्ये आयटम साँगसाठी नावाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 22:50 IST
1 / 9Pushpa 2 Item Song Gossip: तुम्हाला 'ओ अंटावा' हा आयटम नंबर नक्कीच आठवत असेल. अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटात समंथा रूथ प्रभूने यात डान्स केला होता. आता पुष्पा-2 चित्रपटात एक नवी नायिका ही जागा घेणार असल्याची चर्चा आहे.2 / 9पहिल्या चित्रपटात समंथाने तो डान्स लोकप्रिय केला होता. आता या 'पुष्पा-2' या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी चित्रपटात नवी अभिनेत्री दिसणार आहे.3 / 9'पुष्पा द रुल'चे शूटिंग तसेच पोस्ट प्रोडक्शनचे काम सध्या जोरात सुरू आहे. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार, चित्रपटातील आयटम नंबरसाठी नवीन चेहरा दिसणार आहे.4 / 9तेलुगू सिनेमाची उगवती अभिनेत्री श्रीलीला, जी तिची डॉक्टरेट करत आहे, ती आघाडीवर असल्याचे सांगितले जाते.5 / 9संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद उर्फ डीएसपी यांनी चित्रपटासाठी जवळपास सर्व गाणी संगीतबद्ध केली आहेत. नवे आयटम साँग 'ऊ अंटावा' पेक्षा अधिक मधुर, मोहक आणि मादक असणार आहे असे बोलले जात आहे.6 / 9या आयटमचे चित्रीकरण करणारी श्रीलीला ही अलीकडच्या काळातील तेलुगू चित्रपटसृष्टीतील झपाट्याने उगवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.7 / 9तिने आतापर्यंत अभिनेता पवन कल्याणच्या 'उस्ताद भगतसिंग', महेश बाबूच्या 'गुंटूर करम'मध्ये दिसली आहे आणि एक चित्रपट साइन केला आहे.8 / 9अमेरिकेत जन्मलेली श्रीलीला ही बंगळुरू येथील एका प्रख्यात उद्योगपतीची मुलगी आहे. श्रीलीलाने चार वर्षांपूर्वी कन्नड सिनेमात पदार्पण केले होते, पण आता तिचे पूर्ण लक्ष तेलुगू सिनेमावर आहे.9 / 922 वर्षीय अभिनेत्रीने दोन अपंग मुले दत्तक घेतल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांनी या मुलांना दत्तक घेतले.