By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 16:17 IST
1 / 10२१ वर्षांची अशनूर कौर 'बिग बॉस'नंतर सातत्याने चर्चेत आहे. ती तिच्या करिअरमध्ये खूप चांगली प्रगती करत आहे, मात्र अशनूरला अनेकदा 'बॉडी शेमिंग'चा सामना करावा लागतो. 2 / 10बिग बॉसमध्येही अशनूरच्या वजनाची खूप खिल्ली उडवण्यात आली होती. आता अभिनेत्रीने बॉडी शेमिंगवर आपलं मौन सोडत भावना व्यक्त केल्या आहेत.3 / 10सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अशनूर म्हणाली, 'बॉडी शेमिंगची सुरुवात मानसिक पातळीवर होते. तुमच्या मनात एक प्रकारचा 'ट्रॉमा' बसतो. त्यामुळे शांत राहा.'4 / 10अशनूर पुढे म्हणाली की, 'तुम्ही कितीही फिटनेस ट्रेंड किंवा डाएट फॉलो केले तरी शेवटी आत्मविश्वास आतूनच येतो. मी वजन कमी करण्यासाठी सर्व काही करून पाहिलं आहे.'5 / 10'मी वॉटर डाएट, कीटो डाएट फॉलो केलं, अनेक प्रकारचे वर्कआउट केले आणि अनेक ट्रेनर्सकडून प्रशिक्षण घेतलं. पण कशाचाही उपयोग झाला नाही.'6 / 10जेव्हा अशनूरला विचारण्यात आलं की, या प्रवासात ती स्वतःबद्दल दयाळू होती का? तेव्हा ती म्हणाली, 'मी स्वतःसोबत खूप कठोर झाले होते. अनेक वेळा तर मी सेटवर बेशुद्ध पडले होते, कारण मी नीट खाण्यापिण्याकडे लक्ष देत नव्हते.'7 / 10एका मित्राने तिला ब्लड टेस्ट करण्याचा सल्ला दिला होता, ज्याचा रिपोर्ट नॉर्मल आला. त्यानंतर दुसऱ्या एका मित्राने तिला 'हार्मोनल इश्यू'ची तपासणी करायला सांगितली. 8 / 10अभिनेत्री म्हणाली, 'तेव्हा मला समजलं की माझ्या हार्मोन्समध्ये काहीतरी बिघाड होता, ज्यामुळे माझं वजन एका जागेवर थांबलं होतं. हार्मोनल असंतुलनामुळे वजन कमी करणं अत्यंत कठीण असतं.'9 / 10याआधी 'बिग बॉस १९' मध्येही अशनूरने आपल्या बॉडी इमेजवर भाष्य केले होते. टीनएजरपासूनच ती वाढत्या वजनाच्या समस्येशी झुंजत असल्याचं तिने सांगितलं होतं. 10 / 10ही गोष्ट सांगताना अशनूर भावूक झाली होती आणि म्हणाली होती की, 'हा माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग राहिला आहे. टीनएजरमध्ये मला बॉडी इमेज इश्यूजचा मोठा सामना करावा लागला.'