Join us
Daily Top 2Weekly Top 5

ती पुन्हा येतंय! तापसी पन्नूच्या 'फिर आयी हसीन दिलरुबा' चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 14:29 IST

'पागलपन की हद तक न गुजरे वह प्यार ही कैसा.....' हा डॉयलॉग ऐकताच टाळ्यांचा कडकडाट झाला होता. 'हसीन दिलरुबा' ...

'पागलपन की हद तक न गुजरे वह प्यार ही कैसा.....' हा डॉयलॉग ऐकताच टाळ्यांचा कडकडाट झाला होता. 'हसीन दिलरुबा'  या चित्रपटाच्या कथेचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक करण्यापासून कोणीही मागे हटले नाही. आता या चित्रपटाचा सिक्वेल "फिर आयी हसीन दिलरुबा'चा टीझर प्रदर्शित झाला आहे.  सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या टीझरमधून तापसी अन् विक्रांत मेस्सीची वेगळीच मिस्ट्री दिसून येत आहे. 

'हसीन दिलरुबा' चित्रपटाच्या यशानंतर आता चित्रपटाचा दुसरा भागही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. 'हसीन दिलरुबा' चित्रपटात तापसी पन्नू, विक्रांत मेसी, हर्षवर्धन राणे अशा अनेक कलाकारांचा समावेश होता. ही रोमँटिक-थ्रिलर फ्रँचायझी पुन्हा एकदा नव्या रुपात पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.  यावेळी एक नवीन पात्र सादर करण्यात आले आहे, ज्यामध्ये लोकप्रिय अभिनेता सनी कौशल आहे. तसेच जिमी शेरगिल हा पोलिस अधिकाऱ्याची भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, तापसी पन्नू आणि विक्रांत यांचा हा चित्रपट एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे.  'फिर आयी हसीन दिलरुबा' हा 'हसीन दिलरुबा' चा सीक्वल आहे, ज्याचा प्रीमियर केवळ OTT प्लॅटफॉर्म Netflix वर जुलै 2021 मध्ये झाला होता आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात विक्रांत, तापसी पन्नू आणि अभिनेता हर्षवर्धन राणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान "फिर आयी हसीन दिलरुबा" च्या प्रदर्शनाची तारीख  अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या सिनेमाची चाहत्यांना कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :तापसी पन्नूसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमानेटफ्लिक्सविक्रांत मेसी