Join us

फिल्म नाही, दूरदर्शनवरून डेब्यू... परिणीती चोप्राचा जुना व्हिडीओ पाहून चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 14:53 IST

परिणीतीचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

बॉलिवूडची परी अर्थात परिणीती चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.  परिणीती 'चमकीला' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.  प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांकडून परिणीती चोप्राचं कौतुक होत आहे. यातच परिणितीचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ज्यामध्ये ती दूरदर्शन वाहिनीच्या एका कार्यक्रमात गाणे गाताना दिसत आहे.

परिणीतीचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. खुद्द परिणीती चोप्राने तिच्या अधिकृत X हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'माझं खरं पदार्पण'.  या व्हिडिओमध्ये ती दूरदर्शनच्या एका देशभक्तीपर कार्यक्रमात 'तन मन से अपने देश की सेवा'  हे गाणं गाताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत इतरही अनेक मुले आहेत. 

परिणीतीच्या करिअरची सुरुवात ही  YRF ऑफिसमध्ये इंटर्न म्हणून झाली होती. परिणीतीने 'लेडीज व्हर्सेस रिकी बहल'या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती रणवीर सिंगच्या अपोझिट दिसली होती.  या चित्रपटाला  बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण या चित्रपटातून परिणीतीचीही बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री झाली. 

यानंतर 'इशकजादे' हा सोलो चित्रपट परिणीतीला मिळाला. हा परिणीतीचा खऱ्या अर्थाने डेब्यू होता. यात ती लीड अभिनेत्री होती. या चित्रपटानंतर परिणीतीने कधीच मागे वळून पाहिले नाही. अभिनेत्री असण्यासोबतच परिणीती चांगली गायिका सुद्धा आहे. तिने "केसर’" चित्रपटातील "तेरे मिट्टी में मिल जावा" आणि मेरी प्यारी बिंदू सिनेमातील "मान की हम यार नहीं" हे गाणं गायलं आहे.  अमर सिंग चमकिलापूर्वी अक्षय कुमारसोबत मिशन रानीगंजमध्ये ती दिसली होती.

टॅग्स :परिणीती चोप्रासेलिब्रिटीबॉलिवूडसोशल मीडिया