Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या निकाहावेळी वेटरपासून डीजेही रडले', पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 19:30 IST

माहिरा खान नेहमीच तिच्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत असते.

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) गेल्या वर्षीच पुन्हा लग्नबंधनात अडकली. 2 ऑक्टोबर 2023 रोजी तिने सलीम करीमसोबत लग्न केले. दोघंही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. माहिरा खानचं हे दुसरं लग्न असून पहिल्या लग्नातून तिला 14 वर्षांचा एक मुलगाही आहे. तोही आईच्या लग्नात उपस्थित होता. माहिराच्या लग्नात सगळेच खूप भावूक झाले होते. याचा एक किस्सा तिने नुकताच एका मुलाखतीत सांगितला.

माहिरा खान नेहमीच तिच्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. शाहरुख खानसोबत ती 'रईस' मध्ये झळकली होती. गेल्या वर्षी माहिराने दुसरं लग्न करत सर्वांनाच धक्का दिला. तिच्या लग्नात केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार होता. तिच्या निकाहाला उपस्थित सर्वच लोकांचे डोळे पाणावले होते. अभिनेत्री म्हणाली, "माझ्या निकाहवेळी सर्वांनीच खूप धमाल केली. तसंच प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी होतं. पण ते दु:खाचं नाही तर आनंदाश्रू होते. एकही व्यक्ती असा नव्हता जो रडला नसेल. वेटरपासून ते डीजेपर्यंत सगळ्यांचेच डोळे पाणावले होते. ते बघून मला असं वाटलं की बापरे काय झालं एवढं. मला खूपच आश्चर्य वाटत होतं."

पाकिस्तानी मालिका 'हमसफर' मधून माहिरा लोकप्रिय झाली. अगदी भारतातही ही मालिका पाहिली गेली आणि सर्वच तिचे चाहते झाले. यातील तिची आणि फवाद खानची जोडी हिट झाली. फवाद खानही तिच्या संगीतमध्ये उपस्थित होता. त्याला व्हिडिओत पाहून चाहते तर वेडेच झाले होते. माहिराचा निकाह चांगलाच चर्चेत होता. 

टॅग्स :माहिरा खानलग्नबॉलिवूड