Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: नुसरत भरुचाने दिवाळीच्या आधी खरेदी केली नवी रेंज रोव्हर, स्वत:लाच दिलं खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 17:20 IST

या कारची किंमत माहितीये का?

'सोनू की टिटू की स्वीटी','अकेली' फेम अभिनेत्री नुसरत भरुचाने (Nusrat Bhrucha)  स्वत:साठी महागडी कार खरेदी केली आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर तिने नवीन रेंज रोव्हर घेतली आहे. नुकतंच अभिनेत्री नवीन कारमधून सिद्धीविनायकाच्या दर्शनाला आली होती. तिथे तिने फोटोशूटही केलं तसंच पापाराझींसमोर पोज दिली. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

नुसरत भरुचाने ब्लॅक रंगाची नवीकोरी रेंज रोव्हर घेतली आहे. या कारची किंमत तब्बल २ कोटी रुपये आहे. आपल्या नव्याकोऱ्या गाडीतून ती सिद्धीविनायकाच्या दर्शनाला पोहोचली. तिने यावेळी लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. मुंबईत रेंज रोव्हरवर फिरत असतानाचे तिचे व्हिडिओही व्हायरल झाले. सध्या भारतात या कारला खूप मागणी प्राप्त झाली आहे. वर्ल्ड क्लास अमेनिटीज, मसाज सीट्स, हेड्स अप डिस्प्ले, नॉईज कॅन्सिलेशन असे अनेक फीचर्स कारमध्ये आहेत. 

नुसरतने स्वत:लाच हे दिवाळी गिफ्ट दिलं आहे. तिने कारची पूजा केली, फुलं चढवली आणि त्यानंतर ती सिद्धीविनायकाला रवाना झाल्याचं दिसत आहे. तिने सर्वांचे आभारही मानले. 

नुसरतचा २०२३ साली 'अकेली' रिलीज झाला होता. यातील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

टॅग्स :नुसरत भारूचालँड रोव्हरकारबॉलिवूड