Join us
Daily Top 2Weekly Top 5

आज रितेश नाही तर निलेश साबळे सांभाळणार 'बिग बॉस मराठी'ची धुरा, सर्वांना घेतलं फैलावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 14:48 IST

आज बिग बॉस मराठीच्या घरात भाऊचा धक्का होणार नसून निलेश साबळेची एन्ट्री होणार आहे (bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सीझनमध्ये दिवसेंदिवस रंगत निर्माण होत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात दर शनिवारी रितेश देशमुखच्या उपस्थितीत भाऊचा धक्का रंगताना दिसतो. परंतु आज शनिवारी मात्र रितेश देशमुख दिसणार नाहीय. रितेशऐवजी आज सदस्यांची शाळा घ्यायला डॉ. निलेश साबळे घरात येणार आहे. निलेशची घरात एन्ट्री होताच सदस्यांना चांगलाच आनंद झालेला दिसतोय. निलेश साबळेने आल्या आल्याच सर्वांना चांगलंच फैलावर घेतलंय.

निलेशने सदस्यांसोबत खेळला विशेष गेम

निलेश साबळेची आज घरात एन्ट्री होणार आहे. निलेश साबळेने घरात येताच सदस्यांना चांगलंंच फैलावर घेतलं. बिग बॉसच्या घरातला कोण काकाकुआ आहे ज्याला तुम्ही अजून ओळखलं नाही? कोण चायनीज कोथींबीर आहे जिला तुम्हाला बाहेर काढावंसं वाटतं? जान्हवी तुमच्या हातात जर बंदूक दिली तर कोणावर निशाणा साधाल? असे प्रश्न विचारुन निलेशने सर्वांना भंडावून सोडून बोलती बंद केलीय. 

आज भाऊचा धक्का होणार की नाही?

आज निलेश साबळे बिग बॉस मराठीची धुरा सांभाळणार आहे. निलेश साबळे आज भाऊचा धक्क्यावर येऊन रितेश देशमुख नसणार आहे. त्यामुळे सदस्यांना खडसवायला रितेश देशमुख नसणार आहे. त्याऐवजी डॉ. निलेश साबळे सर्वांसोबत मजा करताना दिसणार आहे. याशिवाय आज बिग बॉसच्या घरात पत्रकार येणार आहेत. स्पष्ट आणि परखड प्रश्न विचारुन पत्रकार घरातील सदस्यांवर प्रश्नांच्या फैरी झाडणार आहेत.

 

टॅग्स :बिग बॉस मराठीनिलेश साबळेरितेश देशमुख