Join us

OMG...! चिमुकलीच्या डान्स स्टेप्स पाहून थक्क झाली Nora Fatehi, एकटक पाहातच राहिली; Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 12:02 IST

नृत्य हे एक असं माध्यम आहे की ज्यानं भले भले घायाळ होतात. नोरा फतेही याचं उत्तम उदाहरण मानलं जातं. सौंदर्य आणि त्यास अप्रतिम नृत्याची जोड असं अनोखं रसायन असलेली नोरा फतेही हिनं अनेकांची मनं जिंकली आहेत.

नृत्य हे एक असं माध्यम आहे की ज्यानं भले भले घायाळ होतात. नोरा फतेही याचं उत्तम उदाहरण मानलं जातं. सौंदर्य आणि त्यास अप्रतिम नृत्याची जोड असं अनोखं रसायन असलेली नोरा फतेही हिनं अनेकांची मनं जिंकली आहेत. जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. अगदी लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटात नोराचे चाहते आहेत. नोराच्या किलर डान्स स्टेप्सनं फक्त तरुणाई नव्हे, तर चिमुकल्यांमध्येही तिची क्रेझ आहे. अशीच एक चिमुकली फॅन नोराला भेटली आणि तिनं पुढे जे काही केलं ते पाहून स्वत: नोरा थक्क झाली. 

नोरा फतेही आणि तिच्या एका चिमुकल्या चाहतीसोबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक चिमुकली फॅन नोराच्या लोकप्रिय साकी साकी गाण्यातील स्टेप तिला करुन दाखवताना दिसते. चिमुकलीनं अतिशय कठीण स्टेप सहजपणे केल्यानंतर नोराला देखील धक्का बसतो आणि ती तिचं कौतुक करू लागते. 

चिमुकली फॅन इथवरच थांबली नाही, तर तिनं नोराची जमेची बाजू असलेल्या बेली डान्सचीही झलक तिच्यासमोर सादर केली. चिमुकलीचा हटके बेली डान्सपासून नोरा खूपच इम्प्रेस झाली आणि तिनं चिमुकलीचं तोंडभरुन कौतुक केलं. नोरा किती खूष झाली हे व्हिडिओतूनही कळून येतं. आपल्या डान्स स्टेप्सला चिमुकली मुलं देखील अगदी जसंच्या तसं फॉलो करतात हे पाहून नोराला आश्चर्याचा धक्का बसल्याचं दिसून येतं. 

टॅग्स :नोरा फतेहीबॉलिवूड