Join us

VIDEO : नोराचा हॉट डान्स पाहून रणवीर सिंह घामाघुम, मग दोघांनी एकत्र डान्स करून स्टेजवर लावली 'आग'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 10:57 IST

Nora Fatehi-Ranveer Singh Hot Dance: नुकतीच 'डांस दीवाने' च्या स्टेजवर नोरा आपल्या कमाल अदांनी 'आग' लावताना दिसली. नोराने 'हाय गरमी' गाण्यावर धमाकेदार मुव्ह्स केले. यावेळी तिला अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने साथ दिली.

Nora Fatehi Hot Dance: नोरा फतेही (Nora Fatehi) एक जबरदस्त डान्सर आहे यात अजिबात दुमत नाही आणि सध्या तरी बॉलिवूडमध्ये तिला डान्समध्ये टक्कर देणारी दुसरी अभिनेत्री दिसत नाही. नुकतीच 'डांस दीवाने' च्या स्टेजवर नोरा आपल्या कमाल अदांनी 'आग' लावताना दिसली. नोराने 'हाय गरमी' गाण्यावर धमाकेदार मुव्ह्स केले. यावेळी तिला अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने साथ दिली.

नोरा फतेही (Nora Fatehi) चा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी शोमध्ये असलेला रणवीर सिंह यालाही तिचा डान्स पाहून घाम फुटल्याचं बघायला मिळतं. रणवीर सिंह आणि नोराचा सोबतचा हा पहिलाच डान्स व्हिडीओ असेल. दोघांना एकत्र बघून फॅन्सही खूश झाले आहेत. रणवीर सिंह 'जयेशभाई जोरदार' चं प्रमोशन करण्यासाठी शोमध्ये गेला होता. त्यावेळी त्याला नोरासोबत डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही.

रणवीर सिंह नोरा फतेहीसोबत कुसू कुसू गाण्यावर डान्स करताना जोरात कंबर मटकवताना दिसत आहे. रणवीर सिंह कंबर मटकवताना दिसला तर नोराही अवाक् झाली. हा व्हिडीओ नोरा फतेही फॅन क्लबच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. फॅन्स दोघांच्याही  डान्सचं भरभरून कौतुक करत आहेत.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर रणवीर सिंह हा सध्या एकापाठी एक अनेक सिनेमात काम करत आहे. सध्या त्याचा जयेशभाई जोरदार हा सिनेमा रिलीज होणार आहे. तसेच तो 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky aur Rani ki Prem Kahani) आणि सर्कस चं शूटींग करत आहे. 

टॅग्स :रणवीर सिंगनोरा फतेहीबॉलिवूड