Join us

VIDEO : नोरा फतेहीचा नवा रेड कार्पेट लूक पाहून फॅन्सची बोलती बंद, बघाल तर बघतच रहाल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 13:11 IST

अवॉर्ड शोमध्ये जवळपास सर्वच वेबसीरीजमधील स्टार्स रेड कार्पेटवर उतरले होते आणि येथील सुंदर नजारा कॅमेरात कैद झाला.

फिल्मफेअरने काही दिवसांपूर्वी एक खास अवॉर्ड्स सेरमनीचं  आयोजन केलं होतं. हा अवॉर्ड सेरमनी ओटीटी कॉन्टेटसाठी आयोजित केला जाणार आहे. ज्याला फ्लिक्स फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स असं नाव दिलं आहे. यासाठी अनेक स्टार्ससोबत नोरा फतेही पोहोचली आणि अभिनेत्रीने एक खास व्हिडीओ शेअर केलाय.

या अवॉर्ड शोमध्ये जवळपास सर्वच वेबसीरीजमधील स्टार्स रेड कार्पेटवर उतरले होते आणि येथील सुंदर नजारा कॅमेरात कैद झाला. नोरा फतेही यानिमित्ताने सुंदर गुलाबी गाउनमध्ये दिसली. तिने या ड्रेसवरील एक खास व्हिडीओ आणि काही फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोबतच नोराने कॅप्शन दिलं की, 'हॅप्पी संडे'.

नोराने या सुंदर ड्रेसमध्ये आपले नवीन फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूप साऱ्या आकर्षक पोज देताना दिसली आहे. नोरा ही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव राहते आणि ती जे काही पोस्ट करते त्यावर तिचे फॅन्स लाइक्सचा पाऊस पाडतात. 

टॅग्स :नोरा फतेहीबॉलिवूडसोशल व्हायरल