Join us

खोल दोरीत पडून नोरा फतेहीचा मृत्यू? काय आहे व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:51 IST

नोरा फतेही कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Nora Fatehi Death Hoax: 'दिलबर गर्ल' नोरा फतेही (Nora Fatehi) मरण पावली, अशी अफवा सोशल मीडियावर पसरत आहे.  खोल दोरीवर साहसी खेळ खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका इंस्टाग्राम यूजरने ही महिला नोरा असल्याचा दावा केलाय. पण, ही बातमी  पूर्णपणे खोटी, चुकीची आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये महिलेचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. हा व्हिडीओ पाहाताच ती नोरा नसल्याचं चाहत्याच्या लक्षात आलंय. त्या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले: 'नोराला माहित आहे का की ती मरण पावली आहे म्हणून?'. तर दुसऱ्याने कमेंट केली "का? तुम्ही अफवा का पसरवत आहात?". तर काहीं नेटकऱ्यांनी अशा खोट्या अफवा पसरवल्याबद्दल तक्रार करण्यास सुचवलं आहे. 

एकीकडे नोराच्या मृत्यूची अफवा पसरत आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि पोस्ट शेअर करत आहे. नुकतंच तिचं 'स्नेक' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. ज्याचे ती प्रमोशन करताना पाहायला मिळतेय. अद्यापपर्यंत अभिनेत्री किंवा तिच्या टीमकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

टॅग्स :नोरा फतेहीसेलिब्रिटीबॉलिवूड