Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख खानच्या 'डंकी'तील दुसरं गाणं 'निकले थे कभी हम घर से' रिलीज, ऐकून व्हाल इमोशनल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 15:49 IST

Dunki Movie : शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'डंकी' या चित्रपटातील 'निकले दी कभी हम घर से' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे.

शाहरुख खान(Shah Rukh Khan)च्या बहुप्रतिक्षित 'डंकी' (Dunki) या चित्रपटातील 'निकले दी कभी हम घर से' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे व्हिडिओ नसून एक लिरिकल गाणे आहे जे टी-सीरीजने यूट्यूबवर रिलीज केले आहे. या गाण्यात शाहरुख खान त्याच्या मित्रांसोबत दिसत आहे. हे गाणे रिलीज केल्यानंतर निर्मात्यांनी त्याचे नाव 'डंकी ड्रॉप ३' ठेवले आहे.

'निकले दी कभी हम घर से'  हे गाणं खूप इमोशनल करणारे आहे. ते पाहता हे एक प्रेरणादायी गाणे आहे, जे शाहरुख आणि त्याच्या प्रवासी मित्रांवर चित्रित करण्यात आले आहे, असे दिसते. या लिरिकल गाण्यात अनेक फोटो वापरण्यात आले आहेत ज्यात किंग खान व्यतिरिक्त तापसी पन्नू आणि विकी कौशल दिसत आहेत. निर्मात्यांनी या गीताला 'डंकी ड्रॉप ३' असे नाव दिले आहे. हे गाणे रिलीज होताच काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले. यापूर्वी 'डंकी'मधील 'लुटपुट गया' हे गाणे रिलीज झाले होते. तर हे चित्रपटातील दुसरे गाणे आहे जे १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाले आहे.

डंकी २२ डिसेंबरला होणार प्रदर्शित'डंकी' हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानशिवाय विकी कौशल आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडला आहे. त्यानंतर निर्मात्यांना चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा आणखी जास्त आहेत कारण हा चित्रपट राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केला आहे.

शाहरुखचा या वर्षातील तिसरा चित्रपट२०२३ हे वर्ष शाहरुख खानसाठी सुरुवातीपासूनच छान राहिले आहे. वर्षाच्या सुरुवातीला 'पठाण' आणि नंतर 'जवान'ने बॉक्स ऑफिसवर धमाल केली. अशा परिस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित होताच हिट झाला तर शाहरुखचा हा तिसरा बॅक टू बॅक हिट चित्रपट असेल.

टॅग्स :शाहरुख खानविकी कौशलतापसी पन्नू