Join us

निक्की तांबोळीच्या बॉयफ्रेन्डमुळे कुटुंबाने तिचं कॉलेज जाणं केलं होतं बंद, म्हणाली - तो फार पझेसिव्ह होता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 15:27 IST

काही महिन्यांपूर्वीच कोरोना संक्रमणामुळे निक्की तांबोळीच्या भावाचं निधन झालं होतं. त्यानंतर लगेच ती खतरों के खिलाडीच्या शूटींगसाठी बाहेर गेली होती.

बिग बॉस १४ (Bigg Boss 14) मध्ये दिसण्याआधी निक्की तांबोळी (Nikki Tamboli) साऊथच्या सिनेमांमध्येही दिसली आहे. मात्र बिग बॉसने तिला घराघरात ओळख मिळाली आहे. शोमध्ये निक्कीने आपल्या बिनधास्त अंदाजाने लोकांची मने जिंकली. हेच कारण आहे की निक्की रिअॅलिटी शो विश्वातील मोठं नाव झाली आहे. नुकतीच निक्की खतरों के खिलाडी ११ (Khatron Ke Khiladi 11) मध्येही दिसली होती. या शोमधूनही तिने लोकप्रियता वाढवली.

काही महिन्यांपूर्वीच कोरोना संक्रमणामुळे निक्की तांबोळीच्या भावाचं निधन झालं होतं. त्यानंतर लगेच ती खतरों के खिलाडीच्या शूटींगसाठी बाहेर गेली होती. ज्यामुळे तिला ट्रोलही करण्यात आलं होतं. नुकताच तिने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, जेव्हा ती कॉलेजमध्ये होती तेव्हा तिचा एक बॉयफ्रेन्ड होता. निक्की म्हणाली की, 'सुरूवातीला याबाबत घरातील लोकांना माहीत नव्हतं. पण जशी त्यांना याची खबर लागली. त्यांनी माझं कॉलेजला जाणंच बंद केलं होतं'.

मुलाखतीत निक्की तांबोळी आपल्या बॉयफ्रेन्डबाबत बोलताना पुढे म्हणाली की, 'तिने आजपर्यंत तिच्या बॉयफ्रेन्डसोबत ब्रेकअप केलेलं नाही. तो माझ्याबाबत फार पझेसिव्ह होता'. निक्की सांगते की, 'हा तरूण माझ्या कॉलेजमधील नव्हता. तरी सुद्धा घरातील लोकांनी मला कॉलेजमध्ये जाण्यास मनाई केली'.

दरम्यान, असं सांगितलं जात आहे की, सध्या निक्की तांबोळी काही मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. निक्कीने तमिळ आणि तेलुगु भाषेतील काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने साउथचा सुपरहिट सिनेमा कंचाना ३ मध्येही काम केलं आहे. पण बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी ती बिग बॉसच्या घरात गेली. याचा तिला चांगलाच फायदा झाला. 

टॅग्स :टेलिव्हिजनबिग बॉस