Join us
Daily Top 2Weekly Top 5

Nia Sharma ने शर्टलेस Ravi Dubey सोबत दिल्या अशा पोज, फोटो पाहून लोक म्हणाले - 'So Hot'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 15:13 IST

निया शर्माने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताच काही तासातच या फोटोंना ४ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओज फॅन्ससोबत शेअर करत असते. निया शर्मा आणि अभिनेता रवि दुबे लवकरच जमाई राजा २.० मध्ये दिसणार आहेत. दोघांनाही पुन्हा एकत्र बघण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत. दोघांचे नुकतेच शूट केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघेही या फोटोंमध्ये रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत. निया शर्माने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताच काही तासातच या फोटोंना ४ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

निया शर्मा आणि रवि दुबे बीचवर असल्याचे दिसते. दोघांच्याही या खास फोटोंचं त्यांचे फॅन्स भरभरून कौतुक करत आहेत. निया शर्मा आणि रवि दुबेच्या या फोटोवर पवित्र रिश्ताची अभिनेत्री आशा नेगीने कमेंट केली की, 'उफ्फ'. त्यासोबतच फोटोवर रेहना पंडीतने कमेंट केली आणि लिहिले की, 'बस खत्म...एकीकडे मित्र, एकीकडे क्रश'. 

निया शर्मा आणि रवि दुबेची जोडी जमाई राजाच्या पहिल्या सीझनमध्ये खूप पसंत केली गेली होती. नियाच्या करिअरबाबत सांगायचं तर टीव्हीच्या दुनियेत 'काली'मालिकेतून आली होती. यानंतर निया शर्मा 'एक हजारों मे मेरी बहना है' बघायला मिळाली. ज्यातून तिला भरपूर लोकप्रियताही मिळाली. यानंतर निया शर्माने 'जमाई राजा'मध्ये रवि दुबेसोबत मुख्य भूमिका साकरली होती. नियाने काही दिवसांपूर्वी 'खतरों के खिलाडी' ची ट्रॉफी जिंकली होती. 

निया शर्मा ही नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंसाठी ओळखली जाते. तिच्यावर अनेकदा यूजर्सकडून टीकाही होते. पण ती कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष देत नाही. ती तिच्या कामावर लक्ष केंद्रीत करते. सध्या ती मालिकेच्या विश्वातील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. 

टॅग्स :निया शर्मारवि दुबेटेलिव्हिजनसोशल व्हायरल