Join us

ज्ञानेश्वर माउलीमध्ये नवा ट्विस्ट; मालिकेत होणार 'या' अभिनेत्याची रिएन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 13:40 IST

Dnyaneshwar Mauli: एकीकडे विश्वाच्या शांततेचं मागण मागणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात मात्र आता पुन्हा विसोबा नावाचं एक महावादळ येतयं.

सध्या छोट्या पडद्यावर अनेक पौराणिक आणि ऐतिहाससिक मालिकांची निर्मिती होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यात सध्या सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माउली ही मालिका विशेष लोकप्रिय होत असल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत या मालिकेत ज्ञानेश्वर माऊलींचे अनेक चमत्कार, त्यांनी भावंडांना दिलेली शिकवण असं बरंच काही दाखवण्यात आलं. यात सध्या सुरु असलेला श्रीसार्थ ज्ञानेश्वरीचे अध्याय प्रेक्षकांना विशेष आवडत आहेत. यामध्येच आता या मालिकेत एका अभिनेत्याची रिएन्ट्री होणार आहे.

ज्ञानेश्वर माउलींना त्यांच्या कार्यात सतत विरोध करणाऱ्या विसोबांची आता मालिकेत पुन्हा एन्ट्री होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत विसोबा ही पात्र दिसत नसल्यामुळे प्रेक्षकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता, विसोबा पुन्हा मालिकेत येणार असून ही भूमिका अभिनेता अजय पूरकर साकारणार आहेत.

विद्वत्तेला माणुसकीची जोड आणि माणूस धर्माची कास नसलेले आळंदीतलं एक मोठ प्रस्थ म्हणजे विसोबा खेचर. सारा गाव ज्यांच्या एक कटाक्षाने सुद्धा थरथर कापायचा असे हे आळंदीचे विसोबाशास्त्री. ज्ञानदेवांनी सामान्य लोकांपर्यंत जगणऱ्याच, गीतेचं ज्ञान पोहचवण्याचं त्यांचं ध्येय पूर्णही केलं. एकीकडे विश्वाच्या शांततेचं मागण मागणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात मात्र आता पुन्हा विसोबा नावाचं एक महावादळ येतयं. एकीकडे अहंकार तर दुसरीकडे समर्पण… एकीकडे सत्ता तर दुसरीकडे स्वधर्म !  त्यामुळे या मालिकेत आता नवं वळण पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा अजय पुरकरांचा अभिनय अनुभवता येणार आहे. त्यामुळे या मालिकेतील पुढील भाग पाहण्यास प्रेक्षक आतुर असल्याचं पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :अजय पुरकरसेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार