Join us

'अ‍ॅनिमल'नंतर 'या' सिनेमात दिसणार अनिल कपूर; कमांडिंग ऑफिसरच्या भूमिकेत, पोस्टर आऊट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 15:27 IST

'अ‍ॅनिमल'नंतर आता अनिल कपूर बहुचर्चित ‘फायटर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

झक्कास! असं म्हणलं की डोळ्यासमोर येतो अभिनेता अनिल कपूर. 66 वर्षीय या अभिनेत्याने आपल्या फिटनेसने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलंय. नुकतंच त्यांचा 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 'अ‍ॅनिमल'नंतर आता अनिल कपूर बहुचर्चित ‘फायटर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. आता या चित्रपटामधील अनिल कपूरचा लूक रिलीज करण्यात आला आहे.

बॉलिवूडचे 'मिस्टर इंडिया' सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शित फायटरमध्ये ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंग उर्फ ​​रॉकीची भूमिका साकारणार आहेत. निर्मात्यांनी त्यांचा दमदार आणि जबरदस्त लुक शेअर केला आहे. जो चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनिल कपूर यांनी फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "स्क्वाड्रन लीडर -राकेश जयसिंग,  कॉल साइन- रॉकी, डेजिग्नेशन - कमांडिंग ऑफिसर, यूनिट- एयर ड्रॅगन्स'. 

‘फायटर’ च्या पोस्टरमधील त्याच्या फिटनेसने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलंय. ‘फायटर’ टर सिनेमासाठी अनिल कपूर यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'भूमिकेमध्ये खरेपणा यावा म्हणून मला गंभीर शारिरीक बदलांमधून जावं लागलं. तसंच मी जो युनिफॉर्म घातलाय त्याला मला न्याय द्यायचा होता'. 

 'फायटर' हा चित्रपट पुढच्या वर्षी  25 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अनिल कपूर 'नाईट मॅनेजर' सिरीजमध्येही दिसले होते.  यामध्ये त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. या वयातही ते ज्या पद्धतीने सक्रिय आहे, हे पाहून इतर कलाकारही चकित होत आहेत. 

टॅग्स :अनिल कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी