Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: कोणाला मारली चापट, तर कोणाला मागे खेचलं; जॅकी श्रॉफ यांचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 09:45 IST

जॅकी श्रॉफ यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत जॅकी यांनी फॅन्सना दिलेली वागणुक नेटकऱ्यांना आवडली नाहीय

जॅकी श्रॉफ हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते. जॅकी श्रॉफ यांना त्यांचे फॅन्स लाडाने जग्गूदादा म्हणतात. जग्गूदादा कायम वेगळ्याच मूडमध्ये त्यांच्या चाहत्यांना भेटत असतात. अशातच जग्गूदादांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कायम जग्गूदादांचं कौतुक करणारी लोकं हा व्हिडीओ पाहून मात्र भडकले आहेत. सेल्फी घ्यायला आलेल्या फॅन्सना जग्गूदादांनी दिलेली वागणूक नेटकऱ्यांना आवडलेली नाहीय. 

Instant Bollywood पेजने एक व्हिडीओ शेअर केलाय. यात जग्गूदादांनी सेल्फी घ्यायला आलेल्या फॅन्सला जोरदार चापट मारलेली दिसतेय. याशिवाय एक फॅन सेल्फी घेताना वेगळ्या ठिकाणी हात ठेवतो. "खाली हात काय ठेवतोय. असा हात ठेवायचा." असं म्हणत जग्गूदादा त्या फॅनला शिकवतात आणि मागे खेचतात. मुद्दा असा आहे की, जग्गूदादा सर्व मस्करीत  करत असले तरीही त्यांची मस्करी अनेकांना आवडली  नाहीय.

सेल्फी घ्यायला आलेल्या फॅन्सना जग्गूदादाने दिलेली अशी वागणूक पाहून अनेकांनी "दादा मस्करीची कुस्करी होईल" अशा कमेंट केल्या आहेत. जग्गूदादा अर्थात जॅकी श्रॉफ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर.. काही दिवसांपुर्वी रिलीज झालेल्या 'मस्त मे रहने का' सिनेमात त्यांनी अभिनय केला.  या सिनेमात त्यांच्यासोबत नीना गुप्ताही होत्या. हा सिनेमा प्राईम व्हिडीओ या ओटीटीवर रिलीज झाला. जॅकी श्रॉफ आता लवकरच वरुण धवनसोबत 'बेबी जॉन' सिनेमात अभिनय करत आहेत. हा सिनेमा याचवर्षी पुढील काही दिवसांत रिलीज होईल.

टॅग्स :जॅकी श्रॉफबॉलिवूडसेल्फी