Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेस्ट सर्जरीच्या प्रश्नावर संतापली नेहा धूपिया! म्हणे, मला याची गरज नाही!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 18:15 IST

 गेल्या काही दिवसांपासून नेहाबद्दल एक भलतीच चर्चा सुरु होती. ती म्हणजे, तिने ब्रेस्ट सर्जरी केल्याची.

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया सध्या संसारात रमलीय. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या लग्नामुळेच चर्चेत आहे. नेहाने अगदी गुपचूप लग्नगाठ बांधली आणि मग लोकांनी काढायचे ते तर्क काढलेत. अगदी नेहा लग्नापूर्वी प्रेग्नंट होती, इथपासून तर ती पती अंगदपेक्षा वयानी मोठी आहे, इथपर्यंत तिला डिवचले गेले. गेल्या काही दिवसांपासून नेहाबद्दल एक भलतीच चर्चा सुरु होती. ती म्हणजे, तिने ब्रेस्ट सर्जरी केल्याची. खरे तर आत्तापर्यंत अनेक पद्धतीने ट्रोल हो्ऊनही नेहा शांत होती. पण बेस्ट सर्जरीची गोष्ट ऐकली आणि तिची तळपायाची आग मस्तकात गेली. तिने पहिल्यांदा या मुद्यावर चुप्पी तोडली. केवळ सुंदर दिसण्यासाठी मी स्वत:ला त्रास देऊ इच्छित नाही़ मी कुठलीही सर्जरी केलेली नाही आणि मुळात मला त्याची गरजही नाही. ब्रेस्ट सर्जरी न करताही सुंदर आहेत, अशा अनेक स्त्रियांना मी ओळखते. मी अलीकडे ‘तुम्हारी सुलू’मध्ये विद्या बालनसोबत काम केले. ‘हेलिकॉप्टर ईला’मध्ये काजोलसोबत काम करतेय. या दोघीही कमालीच्या सुंदर आहेत. सुंदर दिसण्यासाठी त्यांनी कुठलीही सर्जरी केलेली नाही. एकतर तुम्ही जॉबवर फोकस करू शकता किंवा बूब जॉबवर, असे नेहा म्हणाली. नेहाच्या या उत्तराने अनेकांची बोलती बंद झाली असणार, हे सांगायला नकोच.सोनम कपूरच्या लग्नानंतर लगेच नेहाने अंगद बेदीसोबत लग्न केले. नेहा धूपिया अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आहे. पण इंडस्ट्रीत ती फार कमाल दाखवू शकलेली नाही.

 

टॅग्स :नेहा धुपिया