Neha Dhupia made the biggest disclosure after the wedding month !! | ​नेहा धूपियाने लग्नाच्या महिन्यानंतर केला सर्वात मोठा खुलासा!!

अभिनेत्री नेहा धूपिया आणि अंगद बेदी यांच्या लग्नाला आता महिना पूर्ण झालाय. कुणाला अगदी कानोकान खबर होऊ न देता नेहा व अंगद यांनी दिल्लीच्या एका गुरूद्वारात लग्न केले होते आणि सगळे लग्नविधी उरकल्यावर लग्नाचा फोटो पोस्ट करून या विवाहाची माहिती दिली होती. तोपर्यंत या लग्नाची कुणाला साधी भणकही नव्हती. आता लग्नाच्या महिनाभरानंतर नेहाने असाच एक खुलासा केला आहे. होय, माझ्या लग्नाबद्दल सर्वांत आधी करण जोहरला कळले होते, असे खुलासा तिने केला आहे. तिने सांगितले की, एकदिवस मी करण जोहरच्या घरी त्याच्या सोफ्यावर बसले होते आणि बोलता बोलता मी त्याला माझ्या लग्नाबद्दल सांगितले. मी आता लग्नासाठी तयार आहे, असे मी करणला म्हणाले. यावर मस्त... मीच ही बातमी पोस्ट करणार, असे तो मला म्हणाला.अंगद बेदीबद्दलही नेहाने बरेच काही सांगितले. चार वर्षांपूर्वी अंगदने मला लग्नासाठी विचारले होते. पण तेव्हा मी कुण्या दुस-यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. मी त्याला नकार दिला. पण त्याने माझ्यावर प्रेम करणे सोडले नाही. चार वर्षांनंतर माझे ब्रेकअप झाले तेव्हा, तू तुझ्या आयुष्यातील चार वर्षे वाया घालवलीत, असे अंगद मला म्हणाला होता. यानंतर अंगदने माझ्यासमोर नाही तर थेट माझ्या घरच्यांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. माझ्या कुटुंबाने हे लग्न आनंदाने मान्य केले. अर्थात अंगदची आई लग्नापूर्वी मला भेटू इच्छित होती. मी त्यांना भेटायला गेले. त्यावेळी त्यांनी मला केवळ एकच प्रश्न विचारला. ‘तू काय करतेस, हे तुला ठाऊक आहे ना?’ हा तो प्रश्न होता. मी माझ्यापरीने याचे उत्तर दिले आणि आमचे लग्न झाले, असे नेहा म्हणाली.
 १० मे रोजी नेहाने अभिनेता अंगद बेदी याच्याशी साताजन्माच्या गाठी बांधल्या. नेहा धुपिया तिचा पती अंगदपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.

ALSO READ : नेहा धूपियाचा ‘हा’ फोटो बघून पती अंगद झाला रोमॅण्टिक !
Web Title: Neha Dhupia made the biggest disclosure after the wedding month !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.