Join us

माझी बायको हो, महिना २५ लाख देतो, बड्या उद्योगपतीची ऑफर, बॉलिवूड अभिनेत्रीचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 16:28 IST

Neetu Chandra: माझ्यासोबत लग्न कर, माझी बायको हो, त्या बदल्यात तुला दरमहा २५ लाख रुपये देतो, अशी ऑफर एका बड्या उद्योगपतीने आपल्याला दिल्याचा दावा बॉलिवूड अभिनेत्री नीतू चंद्रा हिने केला आहे.

मुंबई - माझ्यासोबत लग्न कर, माझी बायको हो, त्या बदल्यात तुला दरमहा २५ लाख रुपये देतो, अशी ऑफर एका बड्या उद्योगपतीने आपल्याला दिल्याचा दावा बॉलिवूड अभिनेत्री नीतू चंद्रा हिने केला आहे. मात्र नितू चंद्रा हिने त्या उद्योगपतीचं नाव जाहीर केलेलं नाही. त्यामुळे हा बडा उद्योगपती कोण? याबाबतच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

नीतू चंद्रा हिनं एका मुलाखतीमध्ये हा गौप्यस्फोट केला ती म्हणाली की, एका बड्या मोठ्या उद्योगपतीने माझ्याकडे लग्नाची मागणी घातली होती. त्याबदल्यात त्याने मला दरमहा २५ लाख रुपये देण्याची ऑफर दिली होती, असा दावा तिने केला. त्या प्रकारानंतर मी लग्नाचा विचार करणंही सोडून दिलंय. तसेच आजच्या घडीला मी आर्थिकदृष्ट्याही कोलमडले आहे. मला काम करायचं आहे, पण मला काम मिळत नाही आहे, अशी व्यथाही तिनं मांडली आहे.

नीतू चंद्रा हिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००५ मध्ये आलेल्या गरम मसाला चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिने एअर हॉस्टेसची भूमिका बजावली होती. त्यानंतर तिने ट्रॅफिक सिग्नल, वन टू थ्री, ओए लक्की लक्की ओए या चित्रपटात काम केलं होतं. 

टॅग्स :नीतू चंद्राबॉलिवूडव्यवसायगुन्हेगारी