Join us
Daily Top 2Weekly Top 5

नीना गुप्तांनी शॉर्ट वनपीसमध्ये केला कहर, नेटकरी म्हणाले, 'वयाची तरी...' लेक मसाबाने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 12:38 IST

नीना गुप्तांची फॅशन बघितलीत का?

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) वयाच्या 64 व्या वर्षीही अतिशय ग्लॅमरस दिसतात. त्यांचा फिटनेस तर कमालीचा आहे. त्यांच्याकडे बघून तरुणींनाही कॉम्प्लेक्स येतो. 'बधाई दो', 'गुडबाय' असे अनेक हिट सिनेमे त्यांनी नुकतेच दिले. तर काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या 'लस्ट स्टोरीज 2' सिनेमातील त्यांच्या भूमिकेचं कौतुक केलं गेलं. नीना गुप्ता आता त्यांच्या फॅशनमुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत याचं कारण म्हणजे त्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

'ट्रायल पिरियड' सिनेमाच्या सक्सेस पार्टीचं काल आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत नीना गुप्ता यांनी हजेरी लावली. नीना गुप्ता कारमधून उतरल्यावर  सर्व त्यांच्याकडे बघतच राहिले. वय हा केवळ आकडाच आहे असंच त्यांची स्टाईल पाहून म्हणावंसं वाटेल. नीना गुप्ता यांनी शॉर्ट ब्लॅक वनपीस घातला होता. डोळ्यावर गॉगल आणि हाय हील्स घालून त्यांनी एंट्री केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

नीना गुप्तांच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. चाहते त्यांच्या या लुकवर फिदा झाले आहेत. 'डोळ्यांवर विश्वासच बसत नाही ही किती सुंदर दिसत आहे' अशा शब्दात एका चाहतीने नीना गुप्तांचं कौतुक केलं आहे. तर काही जणांनी मात्र त्यांना 'आपलं वय बघा','वयाला शोभेल असं वागा' अशी आठवण करुन दिली आहे. मात्र आईला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना लेक मसाबा गुप्ताने उत्तर दिलंय. मसाबाने 'अॅटलिस्ट शी इज ऑल नॅचरल' अशी कमेंट करत ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.

टॅग्स :नीना गुप्ताबॉलिवूडसोशल मीडिया