Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'मधून नीना गुप्ता यांना दिला डच्चू, याबाबत त्यांनीच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 16:20 IST

नीना गुप्ता 'सूर्यवंशी'मध्ये साकारणार होत्या अक्षय कुमारच्या आईची भूमिका

रोहित शेट्टीचे दिग्दर्शन असलेला चित्रपट सूर्यवंशीची घोषणा आणि ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची उत्सुकता आणखीन वाढली आहे. या चित्रपटाच्या रिलीजची प्रेक्षक वाट पाहत आहेत. त्यात आता असं समजतंय की या चित्रपटातून अभिनेत्री नीना गुप्ता बाहेर पडल्या आहेत. या सिनेमासाठी त्यांना साईन करून घेतले होते. तीन दिवसांचे शुटिंगही झाले होते. त्यानंतर त्यांना डच्चू देण्यात आला.इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार,  सूर्यवंशी चित्रपटात नीना गुप्ता यांना अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारण्यासाठी निवडण्यात आले होते. यावर कामही सुरू झाले, पण नंतर एक दिवस त्यांना चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला गेल्याचे खुद्द नीना गुप्ता यांनी माहिती दिली.

याबाबत नीना गुप्ता यांनी सांगितले की, या चित्रपटात काम करण्यासाठी रोहित शेट्टीने नकार दिला नाही. पण माझे त्याच्यासोबत बोलणे होऊ शकले नाही. सिनेमातून बाहेर काढल्याचे मला प्रॉडक्‍शन असिस्टंटने सांगितले. त्यांच्याकडून सांगण्यात आले की, हा ट्रॅक चित्रपटात योग्य वाटत नाही. त्यामुळे त्यांना चित्रपटातून वगळण्यात येत आहे.

सध्या लॉकडाउनमध्ये नीना गुप्ता सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत. त्या फनी व्हिडिओ बनवत आहेत. त्यांच्या व्हिडिओला खूप पसंती मिळते आहे. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकत्याच त्या पंचायत या वेबसीरिजमध्ये पहायला मिळाल्या.आगामी पिंकी फरार चित्रपटात अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्राबरोबर नीना गुप्ता दिसणार आहेत.

टॅग्स :नीना गुप्ताअक्षय कुमारसूर्यवंशी