Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिकाचा एकही सिनेमा पाहिला नाही, नवाजुद्दीन सिद्दीकीचं आश्चर्यकारक विधान; 'स्त्री'बद्दल म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 10:06 IST

अवनीत कौरचं मात्र भरभरुन कौतुक केलं. नक्की काय म्हणाला नवाजुद्दीन सिद्दीकी?

हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) . 'गँग्स ऑफ वासेपूर', 'बजरंगी भाईजान' सारख्या अनेक सिनेमांमधून त्याने अभिनयाची छाप पाडली. नवाजुद्दीनचं टॅलेंट खरोखरंच वाखणण्याजोगं आहे. नवाजुद्दीनने नुकतंच एक आश्चर्यकारक विधान केलं. दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) एकही सिनेमा आजपर्यंत पाहिलेला नाही असं तो म्हणाला. तसंच श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) स्त्री विषयीही त्याने भाष्य केलं. 

नवाजुद्दीन सध्या 'सैय्या की बंदूक' सिनेमाचं प्रमोशन करत आहे. 'फिल्मीज्ञान'ला दिलेल्या मुलाखतीत त्याला काही सेलिब्रिटींची नावं घेत त्यांना कोणते हॅशटॅग देशील असं विचारलं. तर दीपिका पदुकोणचं नाव घेतल्यावर नवाजुद्दीन म्हणाला,  'मी दीपिकाचे चित्रपट बघितलेले नाही तिचं काम पाहिलेलं नाही. त्यामुळे तिच्याबद्दल काही सांगू शकणार नाही.' नवाजुद्दीनच्या या विधानावर सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

याशिवाय नवाजला श्रद्धा कपूरविषयी विचारण्यात आलं. स्त्री अशी हिंटही देण्यात आली. यावर तो म्हणाला, 'मी सिनेमा पाहिलेला नाही. त्यामुळे काही बोलू शकत नाही."

दुसरीकडे नवाजुद्दीनने अवनीत कौरचं मात्र भरभरुन कौतुक केलं. त्याने अवनीतसोबत गेल्यावर्षी 'टिकू वेड्स शेरु' सिनेमात काम केलं होतं. 'अवनीत कमाल अभिनेत्री आहे. खूपच गोड आहे. इतक्या कमी वयात ज्याप्रकारे तिने करिअर सुरु केलं  आहे ती नक्कीच पुडे जाईल. सेल्फ डिपेंडंट आहे.' अशा शब्दात त्याने अवनीतचं कौतुक केलं. तर दीपिका आणि श्रद्धाविषयी मात्र एकही शब्द काढला नाही. 

नवाजुद्दीनच्या या मुलाखतीवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. काही जणांनी नवाजला खूप गर्विष्ठ म्हटले आहे. तर काहींनी त्याला पाठिंबा दिला आहे. 

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीबॉलिवूडदीपिका पादुकोणश्रद्धा कपूर