Join us

Nawazuddin siddiqui : पत्नीच्या आरोपानंतर पहिल्यांदाच नवाजुद्दीनची प्रतिक्रिया, म्हणाला, 'माझ्या मुलांचं नुकसान...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 15:28 IST

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या अनेक दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे.

Nawazuddin siddiqui : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या अनेक दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. नवाजुद्दीनची पत्नी आलियाने त्याच्या कुटुंबियांवर छळ केल्याचा आरोप केला होता.तर नवाजनेही आलियावर पलटवार करत तिच्या चारित्र्याचा खुलासा केला होता. गेले काही वर्ष आलिया दोन्ही मुलांसह दुबईत राहत होती. मात्र आता ती मुंबईत परतली आहे. या सर्व प्रकरणात माझ्या मुलांचं नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया नवाजुद्दीनने दिली आहे. एकंदर सर्व प्रकारानंतर नवाज पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमेर आला आहे.

इन्स्टंट बॉलिवूड यांनी सोशल मीडियावर नवाजुद्दीनचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात पापाराझी त्याला सध्याच्या वादावर प्रश्न विचारत आहे. यावर नवाज म्हणतो,' मी  या सर्व प्रकरणाबाबत सध्या काही बोलू इच्छित नाही. पण या सगळ्यात माझी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होत आहे.माझी मुलं दुबईत शिक्षण घेतात आणि ते इथे एक महिन्यापासून आहेत. माझी हीच विनंती आहे की त्यांचं शिक्षण बंद होऊ नये. अजून मला काही बोलायचं नाही.'

नवाजला शोरा आणि यानी ही दोन मुलं आहेत. दोघांचंही शिक्षण हे दुबईत सुरु असतानाच नवाजची पत्नी आलिया त्यांना मुंबईत घेऊन आली. नवाज त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलत नसल्याचा आरोपही तिने केला होता.

नेमकं प्रकरण काय ?

Nawazuddin Siddiqui : स्क्रिप्टेड आहे हे! नवाजुद्दीनच्या भावाने अभिनेत्यालाच सुनावले खडेबोल

नवाजुद्दिनची पत्नी आलिया आणि आई मेहरुन्निसा यांच्यात वादाला सुरुवात झाली. संपत्तीवरुन दोघींमध्ये वाद झाले. दोघींनी एकमेकींविरोधात तक्रारही दाखल केली आणि नवाजचा हा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला.आलियाने वकिलांच्या मार्फत नवाजवर आणि त्याच्या आईवर गंभीर आरोप केले. नवाजनेही यानंतर आलियाचे खरे रुप काय हे समोर आणत तिचे चारित्र्यच उघड केले. आलिया दुबईतून मुंबईत परत आली आणि हा सर्व वाद सुरु झाला.

नवाज लवकरच 'हड्डी' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये त्याने ट्रांसजेंडरची भूमिका केली आहे. 

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीपरिवारट्रोलसोशल मीडिया