Join us

"मला चांगला जोक सांगा", सायली संजीवच्या पोस्टवर नम्रताची हटके कमेंट, म्हणाली, "महाराष्ट्राची हास्यजत्रा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 13:37 IST

नम्रता संभेरावने सायली संजीवला दिला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघण्याचा सल्ला, म्हणाली...

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव 'झिम्मा २'मुळे चर्चेत आहे. या सिनेमातील तिने साकारलेली कृतिका ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'झिम्मा २'मुळे सायलीच्या चाहत्या वर्गातही प्रचंड वाढ झाली आहे. सायली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही सायली पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असते. सध्या सायलीच्या अशाच एका पोस्टची चर्चा रंगली आहे. 

सायलीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सायली अगदी खळखळून हसताना दिसत आहे. सायलीचा हा फोटो अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने काढला आहे. "मला एक चांगला जोक सांगा, ज्यामुळे मी अशी हसेन", असं कॅप्शन सायलीने या फोटोला दिलं आहे. तिच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. पण, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावने सायलीच्या या पोस्टवर केलेल्या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

नम्रता संभेरावने या फोटोवर कमेंट करत सायलीला महाराष्ट्राची हास्यजत्रा बघण्याचा सल्ला दिला आहे. "महाराष्ट्राची हास्यजत्रा बघ" अशी कमेंट नम्रताने सायलीच्या पोस्टवर केली आहे. तिच्या या कमेंटवर रिप्लाय करत सायलीने हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. 

'काहे दिया परदेस' मालिकेतून सायली संजीव घराघरात पोहोचली. त्यानंतर सायली अनेक सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना दिसली. 'बस्ता' आणि 'गोष्ट एका पैठणीची' हे सायलीचे सिनेमे गाजले. 'हर हर महादेव' या सिनेमात सायली ऐतिहासिक भूमिकेत दिसली होती. 

टॅग्स :सायली संजीवनम्रता आवटे संभेरावमराठी चित्रपटमहाराष्ट्राची हास्य जत्रा