Join us
Daily Top 2Weekly Top 5

"वयाच्या ५० व्या वर्षी मला...", नागा चैतन्यने राणा दग्गुबतीच्या शोवर सांगितला लग्नानंतरचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 16:52 IST

राणा दग्गुबातीच्या चॅट शोमध्ये नागा चैतन्यने वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.

नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) ४ डिसेंबरला पारंपरिक पद्धतीने लग्नबंधनात अडकले. यावेळी संपूर्ण अक्किनेनी आणि धुलिपाला कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार आले होते. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रटींनीही हजेरी लावली. लग्नानंतर या नवविवाहित जोडप्याने आंध्र प्रदेशमधील भ्रामराम्बा समिता मल्लिकार्जुन स्वामी देवस्थानम मंदिरात पूजा केली. दरम्यान नागा चैतन्यने लग्नाआधी 'द राणा दग्गुबाती' च्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने एक खुलासा केला होता.

राणा दग्गुबातीच्या चॅट शोमध्ये नागा चैतन्यने वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. तो म्हणाला, "जेव्हा मी ५० वर्षांचा होईन तेव्हा मला दोन मुलं आणि पत्नीसोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगायचं आहे. मी मुलांना रेसिंग आणि गो कार्टिंगला घेऊन जाईन आणि त्यांच्यासोबत माझ्या बालपणीचे खास क्षण पुन्हा जगेन."

तसंच या शोमध्ये अभिनेत्याने साई पल्लवीसोबत काम करण्याचा अनुभवही सांगितला. तो म्हणाला, "आम्ही थंडेल सिनेमात एकत्र काम केलं आहे. याआधीही आम्ही एकत्र काम केलं होतं. तिच्यासोबत अभिनय आणि नृत्य करायचं म्हटलं की मला भीतीच वाटते."

नागा चैतन्यने याआधी २०१८ साली अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर तीन वर्षांनी २०२१ त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर तीन वर्षातच नागाने दुसरं लग्न केलं आहे.  

टॅग्स :राणा दग्गुबतीTollywoodसेलिब्रिटीलग्न