Join us

मृणाल ठाकूरची अहिराणी तुम्ही ऐकली का? व्हायरल होतोय Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 11:03 IST

मृणालनं अहिराणी बोलत खानदेशातील चाहत्यांची मने जिंकली आहेत.

बॉलिवुड स्टार्स कधी मराठी बोलताना दिसले तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. अनेक बॉलिवूड कलाकारांना चांगलं मराठी बोलता येतं. यातलीच एक म्हणजे मृणाल ठाकूर. आतापर्यंत अनेकदा ती  मराठी बोलताना दिसून आली आहे. मृणालचं मराठी प्रेम कायम दिसून येतं. पण, आता तर तिनं थेट अहिराणी बोलत खानदेशातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मृणालही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतंच तिनं 'आस्क मी सेशन' घेतलं. यावेळी चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे मृणालनं दिली. यावेळी एका चाहत्यानं तिला "तुम्हाला अहिराणी येते का?" असा प्रश्न विचारला. यावर मृणाल थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "तुम्हाला काय वाटस मला अहिराणी नाही येत, अहिराणी-खानदेशी भाषांवर माझं विशेष प्रेम आहे. मी तशीही तिकडची आहे, त्यामुळे मला या भाषेत संवाद साधता येतो. माझी आजी माझ्याशी अहिराणी भाषेत बोलायची. आजी म्हणायची खिचडी करताना खोबरं टाकू, जिरे टाकू, कांदा टाकू, लसूण टाकू, शेंगदाणे टाकू, स्वाद असायला हवा बस...  ". मृणालच्या या व्हिडीओ चाहत्यांकडून भरपूर प्रेम दिले जात आहे.

मृणालनं याआधी देखील मृणालचे मराठीत संवाद साधतानाचे अनेक व्हिडीओ आहेत.  मृणाल ही मूळची धुळ्याची आहे. म्हणून तिला अहिराणी आणि मराठी दोन्ही उत्तम बोलताही येतं आणि खूप गोड ती गातेही. मृणालच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्री लवकरच 'सन ऑफ सरदार २', 'विश्वंभरा' या सिनेमांमध्ये दिसणार आहे.  

टॅग्स :मृणाल ठाकूरबॉलिवूड