भारतीय-कॅनेडियन ए. पी. ढिल्लोंन (AP Dhillon) हा लोकप्रिय पंजाबी गायक आहे. फक्त भारतामध्येच नाही तर जगभरात त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा त्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कारण, हा गायक एका मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.
ए. पी. ढिल्लोंन हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. आयुष्याती अपडेट तो सोशल मीडिद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत असतो. सध्या त्याचं नाव मराठमोळी मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) हिच्याशी जोडलं जात आहे. कारण, ए. पी. ढिल्लोंन याने नुकतेच त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. जी त्याने मृणाल हिला टॅग केली होती. त्याने पोह्यांनी भरलेली एक पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलं, "मी खाल्लेले आतापर्यंतचे सगळ्यात चविष्ट पोहे. थँक्यू मृणाल ठाकूर". ही स्टोरी पाहिल्यानंतर मृणाल आणि एपी ढिल्लोंन एकमेंकाना डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.
मृणाल आणि एपी ढिल्लोंनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्री लवकरच 'सन ऑफ सरदार २', 'विश्वंभरा' या सिनेमांमध्ये दिसणार आहे. मृणाल ही मूळची धुळ्याची आहे. मृणालचं मराठी प्रेम कायम दिसून येतं. तर एपी ढिल्लोंन सध्या भारत दौऱ्यावर आहे. तो देशातील विविध शहरांमध्ये कॉन्सर्ट घेतोय. त्याची 'ब्राऊन मुंडे' आणि 'समर हाय' ही प्रसिद्ध गाणी आहेत.