Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गोल्ड' रिलीज होण्याआधीच मौनी रॉयला लागली लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 12:33 IST

अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा गोल्ड प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांसोबत समीक्षकांदेखील हा सिनेमा पसंतीस उतरला आहे. यामागचे कारण आहे सिनेमाची दमदार कथा आणि अक्षय-मौनीचा अभिनय.

ठळक मुद्देमौनी गोल्डनंतर  आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासोबत ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार मौनीने ‘क्योंकी साँस भी बहु थी’ या मालिकेपासून टीव्ही करिअरला सुरूवात केली होती

अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा गोल्ड प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांसोबत समीक्षकांदेखील हा सिनेमा पसंतीस उतरला आहे. यामागचे कारण आहे सिनेमाची दमदार कथा आणि अक्षय-मौनीचा अभिनय. या दोघांनी सिनेमाचे प्रमोशन करण्यास थोडी ही कसर सोडली नाही.   

प्रमोशनच्या दरम्यान अक्षय कुमारने सांगितले की गोल्ड रिलीज होण्याच्या आधीच मौनी रॉयने तीन सिनेमा साईन केले आहेत. मौनीने गोल्डमधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. अक्षय कुमारदेखील मौनीचे काम बघून इंप्रेस झाला आहे. 

अक्षय म्हणाला मौनी रॉयला अनेक मोठे प्रोजेक्टस मिळाले आहेत. मौनी गोल्डनंतर  आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासोबत ‘ब्रह्मास्त्र’मध्ये तिची वर्णी लागलीये. याशिवाय जॉन अब्राहमसोबत ‘रोमियो अकबर वॉल्टर’ हा चित्रपटही तिच्या झोळीत पडला आहे. पण ही यादी इथेच संपत नाही तर आता एक चौथा चित्रपटही मौनीला मिळाल्याची खबर आहे. होय, या चित्रपटाचे नाव आहे, ‘मेड इन चायना’. या चित्रपटात मौनी राजकुमार रावसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. 

‘ब्रह्मास्त्र’मध्ये मौनी नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. जी रणबीर कपूरच्या प्रत्येकात कामात व्यत्यय आणते. तर रोमियो अकबर वॉल्टरमध्ये ती जॉनच्या अपोझिट दिसणार आहे. ऐवढेच नाही तर ती राजकुमार रावसोबत देखील स्क्रिन शेअर करणार आहे. त्यामुळे ऐकूणच काय तर गोल्ड रिलीज होण्याआधीच मौनीला सिनेमांची लॉटरी लागलीय असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मौनीने ‘क्योंकी साँस भी बहु थी’ या मालिकेपासून टीव्ही करिअरला सुरूवात केली होती.त्यानंतर ‘जरा नच के दिखा’मध्ये कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली होती. ‘देवों के देव महादेव’, ‘बिग बॉस 8’अशा अनेक शोमधून मौनीने स्वत:ची छाप पाडली होती. त्या सगळ्या भूमिकांमुळेच आज मौनीला छोटा पडदा ते रूपेरी पडदा हा पल्ला गाठणे शक्य झाले आहे. 

टॅग्स :मौनी राॅयअक्षय कुमारसोनं