Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोनालिसाच्या लग्नाचं PFI कनेक्शन, दिग्दर्शक सनोज मिश्रांचा मोठा दावा; मोदींकडे मागितला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 18:55 IST

Sanoj Mishra And Monalisa : महाकुंभमुळे प्रकाशझोतात आलेल्या मोनालिसाच्या लग्नावरून सध्या मोठा गदारोळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच तिने केरळमध्ये फरमान खानसोबत लग्न केलं होतं.

महाकुंभमुळे प्रकाशझोतात आलेल्या मोनालिसाच्या लग्नावरून सध्या मोठा गदारोळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच तिने केरळमध्ये फरमान खानसोबत लग्न केलं होतं. मोनालिसाच्या या निर्णयामुळे तिच्या चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा अत्यंत संतापले आहेत. दिग्दर्शकाने या संदर्भात आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात त्यांनी मोनालिसाच्या लग्नाला 'लव्ह जिहाद' म्हटलं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, "मोनालिसाला भडकवून, ज्या प्रकारे भोळ्या-भाबड्या बंजारा समाजाची फसवणूक करून PFI आणि कट्टरपंथी संघटनांनी केरळमध्ये नेऊन लव्ह जिहाद घडवून आणलं आहे."

सनोज मिश्रा पुढे म्हणाले, "मोनालिसाचे वडील जयसिंह यांच्या मते मुलगी अल्पवयीन आहे. बनावट कागदपत्रं बनवून एका तासात लग्नाचं सर्टिफिकेट मिळणं, हे कट्टरपंथीयांचे नेटवर्क किती मजबूत आहे हे सिद्ध करतं. या जिहाद्यांचे षडयंत्र उघड करण्यासाठी आणि बंजारा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी आज १४ मार्च रोजी त्यांच्या गावी (खरगोन जिल्ह्यातील महेश्वर) जाण्यासाठी रवाना झालो आहे."

आपल्या पोस्टच्या शेवटी दिग्दर्शकाने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना आवाहन केलं आहे. त्यांनी लिहिलं की, "मुख्यमंत्री मोहन यादवजींना विनंती आहे की, या गरीब दलित समुदायावर झालेल्या अन्यायाची दखल घेऊन त्वरित कायदेशीर कारवाईचे आदेश द्यावेत. तसेच सर्व सनातन धर्मगुरू आणि संघटनांना विनंती आहे की, त्यांनी महेश्वरला येऊन बंजारा समाजाला न्याय मिळवून देण्यात मदत करावी."

 "मी जेलमध्ये गेलो, माझ्यावर ९.५ कोटींचं कर्ज; मोनालिसा अशिक्षित ..."; दिग्दर्शकाचा गंभीर आरोप

महाकुंभ दरम्यान माळा विकताना मोनालिसाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर तिची तुलना मोठ्या अभिनेत्रींशी होऊ लागली. तिची लोकप्रियता पाहून दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी तिला 'द डायरी ऑफ मणिपूर' हा चित्रपट ऑफर केला. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही आणि एका गाण्याच चित्रीकरण अद्याप बाकी आहे. याच दरम्यान मोनालिसाने लग्न केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Monalisa's marriage has PFI connection, claims director Sanoj Mishra, seeks justice.

Web Summary : Director Sanoj Mishra alleges Monalisa's marriage to Farman Khan is 'love jihad' orchestrated by PFI. He claims Monalisa is underage, and fraudulent documents were used. Mishra seeks justice for the Banjara community and urges authorities to investigate. He's traveling to her village to support the cause.
टॅग्स :टिव्ही कलाकारबॉलिवूडनरेंद्र मोदी